रमजान मुबारक २०२५ - रोजा नं.९
पवित्र कुरआन मध्ये, "उपवासाचे काही ठराविकच दिवस आहेत, परंतु तुमच्या पैकी जे आजारी असतील किंवा प्रवासात असतील तर, त्यांनी इतर वेळी ते राहून गेलेले रोजा (उपवास) ठेवून ते दिवस पूर्ण करावे. आणि ज्या लोकांना उपवास करतांना अतिशय कठीण प्रवास करावे लागत असतील, तर, त्यांनी एका उपवासाच्या बदल्यात एका गरीब माणसाला जेवण द्यावे, आणि जो कोणी आवश्यकते पेक्षा जास्त चांगले कार्य करेल, तर, ते त्यांच्यासाठीच अधिक चांगले आहेत. परंतु, तुम्ही उपवास करा ते तुमच्यासाठी अधिक चांगले आहेत, जर तुम्ही त्या उपवासाचे महत्व जाणाल तर." अद्याय नं. ०२, सुरह बकराह आ. नं. १८४.).इस्लामी सत्ता चे दुसरे खलिपा हजरत उमर बिन खत्ताब रजि. सांगतात कीं,'" तुम्हीं मनापासून (मना) मध्ये केलेल्या दृढ निश्चया ( नियत ) वर व इच्छानुसार किंवा भावना नुसार तुम्हाला त्यांच फळ रिझल्ट ( Result ) मिळत असतात. ".( सहीहं बुखारी हा. नं. ०१)कालच आपण मधुमेह सारख्या आजारा बद्दल नियोजन करण्याचं बघितलं आहेत तर आजून बरेच आजार असे आहेत कीं रोजा व उन्हाळ्यात बाहेर येतात किंवा उदभवतात, मार्च महिन्यात उन्हाळ्याची अगदी सुरुवातच झालेली असते लोकांना तापमानाशी जुळवून घ्यायला जरा वेळच लागतो या मध्ये पुन्हा रमजान मुबारक चे अनिवार्य फर्ज रोज़े आलेत,
काही जर्जर झालेल्या आजार काळजी घेणं गरजेचे आहेत, उदाहरणं :- मधुमेह, रक्त दाब, थायरॉईड, सांधेवांत, किंवा किडनी आजारवाल्याचा मुतखडा, मूळव्याध, फिटचे झटके येणाऱ्या, इत्यादी.
यातील काही आजार दीर्घकाल राहणारे आहेत. त्याची तीव्रता अजून वाढू न देता ते आटोक्यात आणण्यासाठी नियोजन करणं गरजेचे आहेत, कारण त्या आजाराचे योग्य उपचार न झाल्यामुळे दुसरे तिसरे दुसरेच आजार वाढण्याची शक्यता असते म्हणून आपल्या फॅमिली डॉक्टर कडे जावून योग्य सल्ला आणी उपचार घेणे सोयीचे असते, त्यासाठीच आताच काही प्रयत्न करणं गरजेचे आहेत उदाहरणं द्यायचे झाले तर आपल्या दैनंदिन जीवन शैलीत काही बदल करावे लागतात, व नियमित निगा ठेवून वेळेवर औषधे घेतल्यास हें सर्व आजार नियंत्रनात राहू शकतात.
मधुमेही रोजदारांची कधी साखरेचं प्रमाण कमी होऊ शकते, साखरेचं नियमन करणारी यंत्रणा कोलमडून पडू शकते म्हणून मधुमेही रुग्णांनी आपल्या इन्सुलिन चा डोस सेहरी व इफ्तार करतांना डोस कमी ठेवावा, आपल्याला पचेल असेच सेहरी इफ्तारी द्यावी.
रोजा मध्ये ब्लड प्रेशर, हृदय विकारवाल्यानी रोजा ठेवताना आपल्या औषधे सकाळी सेहरी मध्ये द्यावीत प्रमाण मात्र रोजच्या पेक्षा कमीत कमी डोस ठेवावा जेणेकरून नंतर आपले प्रेशर कमी कमी जावून आणीबाणीची परिस्थिती उद्भवेल त्यांनी मिठाचे प्रमाण योग्यच ठेवावे कारण इफ्तारी व सेहरी मध्ये पक्वन्न जरा जास्त खारट, तेलकट, चटपटीत असतात म्हणून थोडी काळजी घेऊन रोजा च नियोजन करावे.
तसेच थयीरॉईडवाल्यांनी सुद्धा आपला एल्ट्रोक्सिन , थायरोक्सिन चा किंवा तत्सम गोळयांचा डोस अर्ध्यावरच ठेवावा,कमीत कमी डोस द्यावं, आपल्या आहारातील प्रमाण ही योग्य तेच ठेवावं.मुतखडा असलेल्या रोजदारांनी जेवढे जास्त होईल तेवढे पाणी जास्त प्यावे, मुतखडा च्या रुग्णांना एक विनंती राहील कीं आपल्याला जास्त पाणी पिण्याची गरज आहेत, त्यांच प्रमाणे सरबत, द्रव्य पदार्थ, नारळ पाणी, कोकम सरबत इत्यादीचे प्रमाण जास्त ठेवावे.
तसेच किडनी विकरातील डायलेसिस च्या रुग्णांनी उपवास ठेवुच नयेत किंवा आपल्या संबंधित डॉक्टर चा सल्ला द्यावा.
मूळव्याध व बांधकोष्टतता वाल्यानी ही पाणी जास्त प्यावे.
शक्यतो सर्व आजारी व आजारी नसलेल्या रोजदारांनी पाण्याचं प्रमाण योग्य ठेवावेत, मार्च महिन्या चे ऊन आहेत तर कधी कधी dehyadration दिहैद्राशन होण्याची शक्यता नाकारता येत नाहीं.
तसेच वारंवार ऍसिडिटी होणाऱ्यांच प्रमाण खूप जास्त आहेत म्हणून अशा रोजदारांनी सेहरी बरोबर ऍसिडिटी गोळया घेऊनच सेहरी करावी किंवा इफ्तारी नंतर लगेच गोळी द्यावी.फिटचे झटके येणाऱ्यांनी आपली एपटॉईन गोळी दोन वेळा घेवून रोजा ठेवावा,
तसेंच एक फार महत्वाचं प्रश्न आहेत तो म्हणजेच संधिवात झालेल्या रुग्ण व रोजदार नमाझीचा, कारण संधिवात झाल्यामुळे नमाज अदा कार्यासाठी साध्याची हालचाल ली काही मर्यादा येतात किंवा ज्यांच्या खुबे व गुढगघ्याचे ऑपरेशन म्हणजेच रिप्लेसमेंट झालेलं आहेत अशा नमाझी नी खुर्चीवरच chair वरच नमाज अदा करावी.
आपण अगोदरच हजरत उमर बिन खात्ताबा रजि. यांनी सांगितलेली हद्दीथ हदीस, ज्यांच्या मनातील इच्छानुसार (नियत) प्रत्येक गोष्टींचे फळ भेटत असतात ".
अगर तुमची खरोखरच रमझान महिन्यातील सर्व सबाब नमाज, रोजा इत्यादी करायची इच्छा असेल परंतु प्रकृती शरीर साथ देत नसेल तर तो नाईलाज समजावा, अल्लाह सर्व काही बघणारा व जाणणारा आहे व असतो, इस्लाम मध्ये अल्लाह नें पर्याय ही ठेवलेले आहेत अल्लाह एवढे क्रूर तर नक्कीच नाहींत, अल्लाह तर कृपालू दयाळू, माफ करणारा आहेत,अल्लाह ला कोण बनवा बनवी करतोय हें सगळे माहित आहेत. अल्लाह ला बनवा बनवी चालत नाहीं, नाहीतर अल्लाह एवढा क्रोध कोणालाही येत नाहीं,
मग कोणाचीही खैर नाहीं. म्हणूनचं अल्लाह च्या क्रोधा पासून वाचवण्यासाठी सर्व श्रद्धावंत कायमच प्रार्थना दुवा करीत असतात, कायमच दुवा मध्ये लिन व्याकुळ झालेलं असतात, "अल्लाह हमारी मागफिरत आता करणा.. अल्लाह हम से राजी होना,हम से जो भी कुछ गलतीयां हुई है उस गलतीयों को माफ करना, "अल्लाह हम्मा अजीरणा मिनिनणार " म्हणून रोजीदारांनी अल्लाह च्या क्रोधा पासून सावधान राहिले पाहिजे.
(मित्रांनो लेख आवडला तर आपल्या सर्व नातेवाईकांना जरूर पाठवा, ते ही फायदा उचलतील, तथा प्रतिक्रिया अवश्य कळवा)
लेखक डॉक्टर :- सलीम साईदा सिकंदर शेख
बैतुशशिफा हॉस्पिटल, श्रीरामपूर,अ.नगर
मोबा: 9271640014

