जे एस ढोरजकर फाउंडेशनचा महिला आनंद मेळावा संपन्न
प्रतिनिधी : महेश चव्हाण
नगर : जागतिक महिला दिनानिमित्त जे एस ढोरजकर फाउंडेशन आयोजित महिला आनंद मेळावा शनिवार दि .८ मार्च रोजी साई इंग्लिश मीडियम स्कूल नवनागापूर या ठिकाणी महिला दिनाचा कार्यक्रम प्रमुख पाहुण्या योगिता विजुभाऊ औटी यांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. महिलांचा उत्साह ओसंडून वाहत होता . यावेळी परिसरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
महिला आनंद मेळाव्यात फूड स्टॉल, मनोरंजनात्मक खेळ, फॅशन शो, लकी ड्रॉ असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
यात महिलांनी मनसोक्त आनंद लुटला . डॉक्टर, इंजिनियर, सामाजिक, राजकीय, विधी या क्षेत्रातील महिला मान्यवर उपस्थित होत्या. महिलांच्या आरोग्याबाबत समस्या यावर डॉ.स्नेहल हिवाळे यांनी मार्गदर्शन केले.
महिला दिनाचे औचित्य साधून स्वर्गीय आकांक्षा ढोरजकर यांच्या मूर्तीचे अनावरण करण्यात आले. नवनागापूर ग्रामपंचायत सदस्या हेमलता चव्हाण, मंगल गोरे, डोंगरे मॅडम, सुनंदा भापकर उपस्थित होत्या. मान्यवरांनी शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक केले. आयोजकांनी साई इंग्लिश मिडियम स्कूल शाळे विषयी माहिती दिली पालकांना त्यांच्या पाल्याचा प्रवेश साई इंग्लिश मिडियम स्कूल मधे घेण्याचे आवाहन केले .

