प्रतिनिधी मोहन शेगर, सोनई
सोनई- नेवासा तालुक्यातील सोनई येथील मटका अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे.
याबाबत दि. ७ रोजी पोलीस कॉन्स्टेबल मृत्यूंजय मोरे यांनी येथील बाबासाहेब कचरु भोसले (वय ४७) रा. खेडले रोड, सोनई हा स्वामी विवेकानंद चौकातील एका टपरीमध्ये कल्याण मटका जुगार खेळताना व खेळविताना मिळून आला असल्याचे दाखल फिर्यादीमध्ये म्हटले आहे.
त्याच्याकडून रोख रक्कम व खेळ खेळण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. १३७/२०२५ महा. जुगार. प्रती कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सोनई पोलीस करत आहेत.

