शिवसेना (शिंदे)गटाची तहसिलदाराकडे निवेदनाव्दारे मागणी
सेनगांव/विश्वनाथ देशमुख
केंद्र व राज्य सरकार कडुन गोरगरीब जनतेला विविध योजनेच्या माध्यमातुन सध्या घरकुलाचे बांधकाम चालु असुन या घरकुल लाभार्थ्यांना वाळु माफक दरात उपलब्ध करुन देण्यात यावे या मागणीचे निवेदन दि.८ एप्रिल मंगळवार रोजी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सेनगांव तहसिलदांना दिले आहे.
गोरगरीब जनतेला स्वत:चे हक्काचे घरकुल असावे म्हणुन केंद्र व राज्य सरकारने विविध योजनेतुन गोरगरीब नागरीकांना घरकुल मंजुर केले असुन सध्या शहरी व ग्रामिण भागात घरकुलाचे बांधकाम सुरु आहेत.मात्र वाळु अभावी घरकुलाचे बांधकाम रखडले असुन गोरगरीब जनतेला तहसिल प्रशासनाच्या वतीने घरकुल लाभार्थ्यांना माफक वाळु उपलब्ध करुन द्यावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.यावेळी सेनगांव तालुकाप्रमुख अमोल खिल्लारी,माजी उप नगराध्यक्ष निखिल देशमुख,उप तालुकाप्रमुख सुनिल चोरमारे,शहरप्रमुख स्वप्निल देशमुख,युवासेना शहरप्रमुख अमर तिडके,विश्वनाथ चव्हाण,अभिषेक गुजर,अभिषेक हराळ,अजय महाजन आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



