सेनगांव/विश्वनाथ देशमुख
सेनगांव येथील नमुना ३४ व नमुना ३७ मधील कुणबी नोंदी मोडी लिपी तज्ञ मार्फत शोधण्यात याव्यात अशी मागणी सेनगांव सकल मराठा समाजाच्या वतीने दि.७ एप्रिल सोमवार रोजी सेनगांव तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सेनगांव येथील सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की,सकल मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी शासनाने गठीत केलेल्या न्यायमूर्ती शिंदे समितीच्या शिफारशीनुसार कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू आहे.सेनगांव मध्ये नमुना 33 मध्ये काही कुणबी नोंदी शोधल्या आहेत.त्याबाबत शासनाचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत परंतु अजूनही नमुना ३४ व नमुना ३७ मधील नोंदींचा शोध घेणे बाकी आहे. सदरील अभिलेखे हे मोडी लिपी मध्ये आहेत त्यामुळे शासनाने मोडी लिपी तज्ञास आदेशित करून राहिलेल्या कुणबी नोंदी शोधण्यात याव्यात,अशी मागणी करण्यात आली आहेया निवेदनावर संदेश देशमुख,एल.एन.वाव्हळ,जी.एम.सरकटे,वसंतराव अवचार,मारुती गीते,गजानन अवचार यांच्यासह सेनगांव येथील सकल मराठा समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


