shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नेवासा पुरवठा विभागात सावळा गोंधळ सर्वसामान्य जनतेची लूट


प्रतिनिधी मोहन शेगर सोनई
सोनई/, नेवासा तालुका पुरवठा विभागात इस्टांकच्या नावाखाली प्रचंड सावळा गोंधळ सुरू असून या विभागात कुणालाचं कोणाला ताळमेळ नाही.

नेवासा तालुक्यातून आलेले गोर गरीब,  सर्वसामान्य जनतेची हेळसांड होत असताना या विभागातील कर्मचाऱ्यांना याचे काही एक सोईर सुतक नसल्याने आलेल्या गोरं गरिबांना उद्धट पणाची भाषा वापरून अपमानित करण्याचे प्रकार सातत्याने घडत असल्याने सर्वसामान्य माणूस या विभागात चकरा मारून बेजार झाला आहे. 
           पुरवठा विभागाचे सहाय्यक कर्मचारी डोळस नामक व्यक्ती हे कोणालाही व्यवस्थित माहिती देत नसल्याने माणसांना येथे काहीच सुचत नसल्याने सर्व सामान्य जनतेची एक प्रकारची पिळवणूक सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळते . याबाबत सविस्तर वृत्त असे कि सोनई येथील संतोष कुंभकर्ण यांनी रेशन दुकानदार त्याचबरोबर पुरवठा विभागामध्ये बंद पडलेले रेशन कार्ड चालू करण्यासाठी एक वर्षापासून रेशन धान्य दुकानदार त्याचबरोबर पुरवठा विभागामध्ये चकरा मारत असून आजपर्यंत त्यांचं रेशन कार्ड चालू करून दिले नाही. प्रत्येक वेळेस पुरवठा विभागाचे सहाय्यक कर्मचारी डोळस हे 15 ऑगस्ट ला चालू होईल, दिवाळीच्या दरम्यान चालू होईल, 26 जानेवारीला चालू होईल  असे करता करता एक वर्ष होऊन गेली अद्यापही रेशन कार्ड चालू झाले नाही. डोळस यांनी आता तर नवीनच पिल्लू चालू केलं आहे 2024 चा इष्टांक समाप्त झालेला आहे . असे सांगून गोरगरिबांचां हरासमेंट करीत आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थी या योजनेमध्ये समाविष्ट करणे बाबत अनेक गोरगरीब दिंन दलित, सर्वसामान्य जनतेने नेवासा पुरवठा विभाग येथे अनेक अर्ज दिलेले आहे. या मध्ये मीही माझा अर्ज  2024 च्या दरम्यान दिला आहे. 


या आधी त्यांना व्यवस्थित रेशन मिळत असते या योजनेमध्ये समाविष्ट करणे बाबत पुरवठा विभाग नेवासा या योजनेमध्ये समाविष्ट करणे बाबत अर्ज दिला असताना सुद्धा आत्ता हा अर्ज नेवासा पुरवठा विभागाच्या कार्यालयला दि 7/10/2025 रोजी प्राप्त झाला असल्याचे लेखी कळविण्यात आले आहे तसेच ग्रामसभेचा ठराव नंबर चार पुरवठा विभाग कार्यालयाला प्राप्त झालेला आहे म्हणजे अजून कमीत कमी सहा महिने पुढील तारीख टाकून कुंभकर्ण यांना पुढील वर्षी येणाऱ्या इष्टांग प्राप्त झाल्यानंतर आपल्या अर्जावर कारवाई करण्यात येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. या कार्यालयातील पुरवठा सहाय्यक डोळस हे डोळे झाकुन  काम करतात काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. 

कारण 07.10.2025 ही तारीख सहा महिन्यानंतरची आहे त्यामुळे या कार्यालयामध्ये नेमके चालले तरी काय कुणाचा कुणाला ताळमेळ नाही. फक्त आलेले लोक झुलवत ठेवायचे उद्धटपणाची, अरे रावीची भाषा वापरून त्यांना तिथून हाकलून लावायचे असले प्रकार नेवासा पुरवठा विभागात सुरू आहे यावर वरिष्ठांचा   यावर कुठलाच अंकुश नसल्याचे दिसून येत आहे. इमर्जन्सी वैद्यकीय उपचारासाठी रेशन कार्ड ची आवश्यकता असते. त्यासाठी सुद्धा आडवणूक केली जाते. असे अनेक प्रकार पाहावयास मिळत आहेत. ऑनलाइन करण्यासाठी येथे माणसांकडून सर्रासपणे पाचशे रुपयाची मागणी केली जात असल्याच्या अनेक तक्रारी आहेत या कार्यालयामध्ये हजारोच्या संख्येने अर्ज दाखल असत कुठल्याही अर्जाचा विचार होत नाही काही अर्ज तर धुळखात पडून आहे त याबाबत संबंधितांना विचारणा केली असता तुमचा अर्ज दाखल झाला नाही अशी उत्तरे दिली जातात याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी अधनग्न आंदोलनाचा इशारा दिला आहे.                            

                                          
पुरवठा विभागात सुरू असलेला गोंधळ व संबंधित रेशन कार्डधारकांना संबंधित योजनेचा फायदा न झाल्यास नेवासा पुरवठा विभागामध्ये अर्ध नग्न आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे तरी एवढे करून सुद्धा या अधिकाऱ्यांचा काही दखल न घेतल्यास तालुका भर तीव्र आंदोलन करण्यात येईल.                     

संदीप कुसळकर माजी उपसरपंच सोनई ग्रामपंचायत.      अनिल बाबासाहेब निमसे,सामाजिक कार्यकर्ते सोनई
close