shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राजकीय गुलामगिरी शेतकऱ्यांना भिकारी बनवते -ऍड. पांडुरंग औताडे

       भारत हे कृषिप्रधान राष्ट्र आहे हे राजकीय सत्य वाटावे अशी व्यवस्था निर्माण करण्यात आली शेतकऱ्याची मुलं 21व्या शतकामध्ये वाटचाल करत असताना हातामध्ये मोबाईल आला शेतीची काम करत असताना पूर्ण वेळ शेतीला पाणी देता देता  बार लावला म्हणजे मोबाईल पाहत आहेत परंतु स्वतःच्या डोक्यामध्ये स्वतःचा मेंदू शिल्लक राहणार नाही याची दक्षता राजकीय व्यवस्था परिपूर्णपणे घेतानी दिसते.


        राजकारणाच्या आधीन झालेला शेतकरी समाज स्वतःच्या जीवन मूल्याचे अस्तित्व विसरून भिकारी बनवण्याकडे  वाटचाल करत चालला यापेक्षा दुर्दैवते काय? साधी सरळ गोष्ट घ्या कृषीप्रधान राष्ट्रामध्ये दिवसाला सात शेतकरी आत्महत्या करत असताना त्या शेतकऱ्याची बातमी कधी हिंदूं, मुस्लिम ख्रिश्चन शेतकरी आत्महत्या केली म्हणून येत नाही तर ती बातमी शेतकरी आत्महत्या होणार आहे. तीच बातमी कधीतरी मराठा मुस्लिम ख्रिश्चन महार चांभार कुंभार किंवा कोणत्याही जातीच्या नावाने येत नाही ती फक्त येथे शेतकरी आत्महत्या म्हणून येते. दंगल झाली वाद झाली तर मात्र दोन जातीमध्ये दोन धर्मामध्ये तेढ म्हणून बातमी येते अथवा पसरवली जाते शेतकरी म्हणून शेतकरी कधी एकत्र येतच नाही त्याची व्यवस्था राजकीय लोकांनी करून ठेवले आहे. 
       वास्तविक जाणीव आणि भान नसलेली शेतकऱ्यांची पुत्र मात्र या भिकार राजकीय व्यवस्थेमुळे भिकारी झाले हे वास्तव देखील त्यांच्या लक्षात येत नाही. शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव  घोषणा कधी सत्यता उतरलीच नाही, हमीभाव कोठे आणि कसा मिळतो याचे एकही उदाहरण सध्या तरी दिसत नाही, शेतकऱ्यासाठी लढणाऱ्या संघटना अथवा पक्ष अगदी बोटावर मोजण्या इतके असताना देखील त्यांना बदनाम करण्याचे काम प्रस्थापित पुढारी आणि पक्ष करतात आरोप केले जातात अफवा पसरवले जातात पैसे कमवतात म्हणून वास्तविक मात्र जे कोणी हे अफवा पसरवतात त्यांच्याकडे जर पाहिली तरी या प्रस्थापित पक्षाच्या नेतृत्वाकडे अमाप संपत्ती असते परंतु फाटका सदरा, मोडके तोडके गाडी घेऊन येणार एखादा शेतकरी संघटनेचा पुढारी दिसला तर याने फार माया कमावली शेतकऱ्यांच्या नावाखाली ही अफवा पसरून शेतकऱ्यांची चळवळ बदनाम केली जाते. व्यापारी असोसिएशनचा अध्यक्ष मर्सडीज मध्ये फिरतो, कंपनीचा लीडर मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये फिरतो अगदीच वकील संघटनेचा बार असोसिएशनचा महाराष्ट्राचा अध्यक्ष मोठ मोठ्या गाड्या फिरतो बंगल्यात राहतो, त्याही पलीकडे जाऊन शिक्षक संघटनेचा अध्यक्ष देखील तसाच फिरतो एखाद्या समाजाच्या अध्यक्ष देखील मोठमोठ्या गाड्यांमध्ये फिरतो मात्र शेतकऱ्याचे चळवळ चालवणारा नेता बच्चुभाऊ सारखा आमदार शेतकऱ्याचे दुःख मांडतो त्यांच्यासाठी भांडतो तर अशा नेतृत्वाला देखील बदनाम करण्यास धारिष्ट दाखविले जाते .
       चळवळ संपविण्यासाठी हे सर्व खेळ खेळले जातात लोक सहज बोलतात खूप पैसा असेल हे वास्तव देखील आहे पैशाशिवाय काही होत नाही परंतु शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या लोकांना बदनाम करून शेतकरी भिकारी होतोय हे मात्र लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. प्रस्थापित पक्ष सांभाळण्याचे काम आदानी अंबानी करत आलेले आहेत त्यांनी शेतकऱ्याकडे कधी लक्ष दिले नाही त्यांच्या हातामध्ये मोठमोठे साधन असताना सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या शेतकरी संघटना त्यांची नेते प्रहार सारखी छोटे छोटे पक्ष हे विधानसभेमध्ये रस्त्यावर असायला हवेत हे वास्तविक सत्य शेतकऱ्यांना कधी समजणार आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकांच्या कल्याणासाठी ही लोक राहतात ही ही सर्वात अफवा समाजामध्ये पसरवून भांडवलदार लोक हा देश चालवतात शेतकऱ्यांना प्रस्थापित पक्षाकडे आकर्षित करून त्यांची मुलं शिपाई सहकारामध्ये सहा सहा महिन्यात पैसे भेटत नाही .
        या ठिकाणी नोकरी करण्यासाठी राबवले जातात त्यांच्या मनामध्ये भासवले जाते ते साहेबांच्या किती जवळच्या आहेत परंतु हीच राजकीय व्यवस्था शेतकऱ्यांना लढण्यापासून दूर करून या राजकीय व्यवस्थेतून शेतकरी भिकारी बनवला जातो हे वास्तव ज्यावेळी शेतकऱ्याच्या लक्षात येईल त्यावेळी शेतकरी पेटवून उठेल हे सर्व उलथून टाकल्याशिवाय राहणार नाही परंतु त्याला गरज आहे छत्रपतींच्या मातीची त्या मातीच्या रक्ताची मातीसाठी रक्त सांडणाऱ्या माणसाची आज एक एक मावळा कर्जबाजारी मुळे आत्महत्या करत असताना ही भिकारी व्यवस्था राजकीय व्यवस्था शेतकऱ्यांना भिकारी व बनवत आहे हेच वास्तव शेतकऱ्यांनो तुम्ही राजकारण निश्चित करा परंतु अशा काळात करा ज्या काळात निवडणूक असतील इतर काळात मात्र तो आमदार खासदार मंत्री कोणत्याही पक्षाचा असो आत्महत्या करणे ऐवजी त्याला जाब विचारा आमच्या दुरावस्थेसाठी तो जर ह******  करणार असशील तर तुला देखील पाच वर्षांनी नाही आजच आम्ही जागा दाखवितो आमचा प्रतिनिधी म्हणून निवडून गेलास तर आमची बाजू घे एवढे बोलण्याची हिंमत शेतकऱ्यांमध्ये आल्यावर बळीचे राज्य येण्यासाठी वेळ लागणार नाही.

ऍड. पांडुरंग केशव औताडे 9890273656
close