shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रशांत निर्मळे यांची असिस्टंट मॅनेजर पदी निवड झाल्याबद्दल सत्कार.

प्रशांत  निर्मळे यांची  असिस्टंट मॅनेजर पदी निवड झाल्याबद्दल सत्कार.
इंदापूर : प्रशांत अंबादास निर्मळे यांची बँक ऑफ बडोदा शाखा लोणी देवकर येथे असिस्टंट मॅनेजर पदी नुकतीचे नियुक्ती झाल्याबद्दल महादेवनगर सेवा समिती इंदापूर आणि मित्रपरिवार इंदापूर यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. 
      
           निर्मळे यांचे मुळगाव किलज ता. तुळजापूर जि. धाराशिव असून कामाची सुरुवात दि. ३० मे २०१४ रोजी देना बँक शाखा मुंबई क्लर्क पदावरून केली. घरची परस्थिती बेताची परंतु सर्व परस्थितीवर मात करत दि.१ एप्रिल२०२५ रोजी बँक ऑफ बडोदा शाखा लोणी देवकर याठिकाणी असिस्टंट मॅनेजर पदाला गवसणी घातली. 

 सत्काराला उत्तर देताना निर्मळे यांना आनंद अश्रू आवरता आले नाहीत. एक अभिमानास्पद प्रवासाबद्दल सर्वांनी मिळून त्यांचा जाहीर सत्कार करून अभिनंदन केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानले.

    यावेळी बंडू दडस, भागवत घनवट, श्रीमंत बंडगर,  ऑफ बडोदाचे काळे व विद्यार्थी संघटनेचे सचिव निरंजन खराडे तसेच मोरे  उपस्थित होते.
close