देवळाली प्रवरा - दि. ०६ एप्रिल
परकीय आक्रमना पासुन देशाच्या सीमेचे रक्षण करणेसाठी देश सेवेस स्वतःला वाहून घेतलेल्या माजी सैनिकांनी आता गावातील झुंडशाही संपविण्यासाठी समोर येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रहार चे जिल्हा उपाध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांनी केले.
देवळाली प्रवरा येथील सुभेदार मेजर भाऊसाहेब विट्ठल मुसमाडे यांच्या सेवा पूर्ती सोहळ्याचे निमित्ताने आयोजीत भव्य अशा कार्यक्रम प्रसंगी ढूस बोलत होते.
भव्य अशा मिरवणुकीनंतर श्रीरामपूर रोड वरील मुसमाडे वस्ती येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी देवळाली प्रवरा व पंचक्रोशितील माजी सैनिक व भाऊसाहेब मुसमाडे यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार, नागरिक मोठया संख्येने उपस्थीत होते.
यावेळी पुढे बोलताना आप्पासाहेब ढूस म्हणाले की, आपल्या सेवा कालावधीत आपण देशाच्या सिमेचे रक्षण केले त्याबद्दल आपले हार्दिक आभार.. पण.., आता आपल्याला गावाचे रक्षण करणे गरजेचे आहे.. गावाच्या विकासात योगदान देणे गरजेचे आहे..!
आजही माझ्या देवळाली प्रवरा शहराला एस टी स्टँड नाहीं.., पोलीस स्टेशन नाही.., क्रीडांगण नाही.., ग्रामीण रुग्णालय नाही.., एखादी शिक्षण संस्था तर येथील नेते मंडळीनी उभी केली नाहीच.. साधा एखादा उद्योग या गावात आणुन येथील तरुणाईला रोजगार दिला नाही..!
परिणामी गावातील बेरोजगार तरुणाईचा गैरफायदा घेवुन काही बालीश मंडळी गाव अस्थिर करीत आहेत.. गावातील तरुणांना चिथावणी देवून एकप्रकारे दरोडेखोर आणि दहशतवादी बनविण्याचे प्रशिक्षण येथे दिले जात आहे.. पालकांनो कार्टी सांभाळा हे आम्हीं यापूर्वीही अनेकवेळा सांगीतले आहे.. तरीही या तरुणांना हाताशी धरून रात्री अपरात्री विरोधकांच्या घरावर हल्ले घडवून आणले जात आहेत.. हे भयाण वास्तव अपना सर्वांना मान्य करावे लागेल.
माझ्या घरावर मध्यरात्री भ्याड हल्ला करून मला व माझ्या कुटुंबाचा जाळून मारण्याचा प्रयत्न झाला.. त्या धक्याने आमची आई दगावली.. नुकताच गावातील आदिवासी कुटुंबाच्या घरावर रात्रि हल्ला करून दरोडा टाकण्यात आला.. त्यात महिलांची आणि लहान मुलींची छेड काढली गेली.. अश्या आणखी अनेक घटना आहेत.. ज्यात गुन्हे दाखल नसल्याने त्या समोर येवू शकल्या नाहीत.. परन्तु या दोन घटनेतिल काही गुन्हेगार एकच असल्याने त्यांचेवर संघटित गुन्हेगारी कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई गरजेची आहे.. त्यासाठी आपण सर्वांनी यकत्र येण्याची गरज आहे.
आम्ही देवळाली ची परळी होऊ देणार नाही हे यापूर्वीच सांगितलेले आहे.. कारण वाल्मीक कराड ने जे जे उद्योग केलेत ते सर्व यांनी केले आहेत.. मग ते जमीन बळकावणे असेल.. खंडणी असेल.. व्याजाचा धंदा असेल, मटका पेढी असेल.. गावात चोऱ्या करने असेल.. त्यामुळे माझ्या गावात जन्मलेल्या या वाल्मीक कराड ला सर्वप्रथम गावातून हकलावे लागेल.. नाहीतर देवळाली ची परळी व्हायला वेळ लागणार नाही.
या मंडळींची गावातील ही गुंडगिरी आणि झुंडशाही थांबविण्यासाठी आणि गावातून यांना हद्दपार करून गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तसेच गावाच्या विकासासाठी देवळाली प्रवरा शहरातील सर्व माजी सैनिकांनी पुढे येण्याची गरज आहे.
आम्हाला खात्री आहे की, ज्या पद्धतीने येथील माजी सैनिक गावच्या भल्यासाठी सातत्याने अग्रेसर राहिला आहे.. त्या पध्दतीने गावगुंडांना हद्दपार करून गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व माजी सैनिक आमच्या सोबत येतील याचा विस्वास आम्हाला असल्याचे शेवटी ढूस यांनी बोलताना सांगितले व मेजर भाऊसाहेब विट्ठल मुसमाडे यांच्या भावि जीवनासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने शुभेछा दिल्या.
प्रसंगी राज्यात विक्रीचा उच्चांक प्रस्थापित केलेले वैभव ढूस लिखीत अंतः आस्ती प्रारंभ हे पुस्तक भेट देऊन सुभेदार मेजर भाऊसाहेब विट्ठल मुसमाडे यांचा ढूस परिवाराचे वतीने सन्मान करण्यात आला.

