अहिल्यानगर
राहाता तालुक्यातील रामपूरवाडी परिसरात घरफोडी करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केला. त्याच्याकडून दोन लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
रवी लाल्या भोसले (वय ४५, रा.लक्ष्मीनगर, कोपरगाव, जि.अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
👉 *गुन्हा केल्याचे तपासात उघड*
आरोपीकड़े अधिक चौकशी केली असता हा गुन्हा डोंगऱ्या शिवराम चव्हाण, सलमानखान शिवराम चव्हाण (पसार) (दोन्ही रा.लक्ष्मीनगर, कोपरगाव), यांच्यासह केला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व उमाकांत गावडे यांच्या पथकाने केली.

