shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडाळा महादेव येथील त्र्यंबकेश्वर देवस्थान या ठिकाणी यात्रा उत्सवाचे आयोजन


 वडाळा महादेव [ प्रतिनिधी ]  
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील जागृत त्र्यंबकेश्वर देवस्थान या ठिकाणी सालाबादाप्रमाणे यात्रा उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी आरती मंडळ तसेच स्वामी समर्थ सेवेकरी भक्त मंडळ यांच्यावतीने जलाभिषेक रुद्र स्वाहाकार महाआरती तसेच येथील भाविक भक्तांच्या वतीने गंगाजल घेऊन आलेल्या भाविकांचे यात्रा उत्सव समिती यांच्यावतीने संवाद्य मिरवणूक  तसेच स्वागत करण्यात येत असते.


      यानंतर महादेव देवस्थान या ठिकाणी यात्रा उत्सव समिती यांच्यावतीने विधिवत पूजन करून यात्रेस प्रारंभ होणार आहे मंदिर परिसरात तसेच मंदिरावर  सुशोभीकरण विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे येथील महादेव देवस्थान शिवकालीन पुरातन स्वयंभू जागृत देवस्थान असून नवसाला पावणारा भोळा महादेव असल्याचे भाविकांमधून बोलले जाते यामुळे दिवसभर नवस स्पुर्तीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असतो यावेळी गुळ शेरनी विविध प्रकारच्या प्रसादाचे वाटप परिसरात होत असते  सायंकाळी साडेसहा वाजता श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांचे शुभ हस्ते ब्रह्म विष्णू महेश या त्रिलिंगी देव देवतांच्या मूर्तीचे विधीवत पूजन होऊन रथामधुन सवाद्य मिरवणूक काढण्यात येणार आहे यावेळी पार्वती स्वरूप काठीचे माळी समाज बांधवांच्या वतीने पूजन करून  रथा बरोबरच मिरवणूक काढण्यात येत असते यानंतर रात्री अकरा वाजता महादेव मंदिर परिसरात फटाक्याच्या आतीष बाजी करून समारोप करण्यात येणार आहे दिनांक ११  रोजी सकाळी साडेनऊ वाजता बहुरूपी कलावंत यांचा हजेरीचा कार्यक्रम होऊन दुपारी कुस्ती हगामा होणार असुन रात्री आठ वाजता जीव तुझ्यात रंगला हा आर्केस्ट्रा होणार आहे तसेच दिनांक बारा रोजी पहाटे साडेपाच वाजता  हनुमान जन्मोत्सव निमित्त दक्षिणमुखी हनुमान मंदिरात महारुद्र अभिषेक आरती हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे तरी भाविकांनी यात्रा उत्सव तसेच विविध कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन येथील यात्रा उत्सव समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.
    
 [ छाया -  राजेन्द्र देसाई  ]
close