shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तणाव तितकाच घ्या, जितका गरजेपुरता असेल,इतका नाही की, संपूर्ण आयुष्याचे वाटोळे होईल…!!


“सांभाळून चला कारण
कौतुकाच्या पुलाखाली
मतलबाची नदी वाहत असते.”


“स्वतःची वाट स्वताच बनवा
कारण इथे लोक वाट
दाखवायला नाही
वाट लावायला बसलेत.”

“नात्याचा कधीही
गैरवापर करू नका
चांगली माणसं आयुष्यात
पुन्हा पुन्हा येत नाहीत..”


“नशिबापेक्षा कर्तृत्वावर
जास्त विश्वास असावा
कारण उद्या येणारी वेळ
आपल्या नशीबामुळे नाही तर
कर्तृत्वामुळे येते.”

“दगडात एक कमी आहे
की तो कधी वितळत नाही
पण एक चांगलेपणा आहे
की तो कधी बदलत नाही.”

“गरुडासारखे उंच जायचे असेल तर
चिमणी-कावळाची सोबत सोडावी लागते.”

“पांढऱ्या शुभऱ्या कपड्यातील
बेईमानीपेक्षा
मळलेल्या कपड्यातील
इमानदारीचा रंग रुबाबदार असतो”

“माणसाला आपल्या ध्येयात
यशस्वी होण्यासाठी
स्वतःवर विश्वास ठेवणे
खूप महत्वाचे आहे! !!

“क्षमतेपेक्षा जास्त धावल की
दम लागतो
आणि
क्षमतेपेक्षा जास्त
धावायला पण दमच लागतो.”

“तुम्ही कितीही गुणी
असलात तरी,
प्रयत्न आणि अभ्यासाशिवाय
सर्व काही व्यर्थ आहे!.”

“ज्यांच्याकडे एकट्याने
चालण्याचे धैर्य आहे त्यांच्या
मागे एक दिवस काफिला असतो.”

“संघर्ष कधीच संपत नाही
त्याच्याशी रोज दोन-दोन हात
करणे आवश्यक आहे!.”

“नेहमीच लहान बनून राहा
प्रत्येकजण तुमच्याबरोबर बसू शकतो,
आणि इतके मोठे व्हा की
जेव्हा आपण उठाल
तेव्हा कोणीही बसललेे नसेल.”

“फसवणूक केली तर आज नाही तर उद्या
तुमची फसवणूक होईल,
जर तुम्ही आयुष्य सत्याने जगलात तर
त्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षणी आनंद मिळेल!.”

“ध्येय सापडले नाही
तर मार्ग बदला!
कारण झाडे मुळे नव्हे
तर पाने बदलतात !! “

कविवर्य 
संजय बबुताई भास्करराव काळे
close