shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भुक.... आकाश सुपारे

भुक जिकडं घेवुन गेली
तिथेच वसवले घरटे....
त्याच मातीत खुपसली 
भावनांची पहार...

लोखंडाचे मन मनगट त्याचे
तो सुकतीने करायचा वंश
परंपरेने चालत आलेल्या
गुलामीवर प्रहार....

तुकड्यासाठी संघर्ष बापाचा
आमच्या अस्तिवाचा परीघ होता...
त्याने कधीच मानली नाही
हार...
आम्हा दगडांचा घास भरवुन
त्याचे कायम उघडे असायचे
काळजाचे दार...

मी ही पहारीची लेखणी केली
करतोय सडक्या व्यवस्तेला
ठार...
त्याचाच अंश आहे मी...
मी आहे जातीवंत वडार....

मी आहे जातीवंत वडार....

तुकाराम सोनाजी सुपारे!
9822510254
close