shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संघटना प्रदेश अध्यक्ष व समन्वय समिती विशेष बैठक/ चर्चा आयोजन


प्रस्तावना
सर्व वडार समाज संघटना एकीकरण याला समविचार गोलमेज परिषद म्हणायला हरकत नसावी जसा कामधंदा उपजिविकेसाठी समाज विखुरला आहे तसा संघटनाची परिस्थिती निर्माण झाली आहे  एक एक संघटना असल्याने संघटनांची प्रशासन दारी प्रश्न मांडण्यास कमी पडतो हे सर्वश्रुत आहे त्यासाठी सर्व संघटना समान कार्य प्रणाली तत्त्वावर एका विचाराने सामाजिक हितासाठी राबवली गेले पाहिजे झालेल्या न कळत चुकून अथवा आपापसात गैरसमज हे गोष्टी असू शकतात शिवाय प्रत्येक संघटना ध्येय धोरणे वैचारिक पातळी वेगळी आहेत दुमत नाही संघटना एकीकरण ही विशिष्ट संघटनाची इच्छा नसून सकल समाजाची मागणी आहे जेणेकरून समाज व सामाजिक संघटना मिळून अपेक्षित फळ मिळेल अशी आशा आहे 

वडार समाज संघटना हे समाज कल्याण हितासाठी *"साला हम झुकगे नही"* ही भूमिका समाज एकतेसाठी समाजासाठी *अत्यंत घातक* ठरणार आहे. जे करायचे तेच करणार असेच होत असेल तर आपला समाज भविष्यात *कधीच माफ* करणार नाही. *आधी समाज, नंतर संघटना,* असे असेल तरच *समाजाचा विकास* होणार आहे.
      आपले समाज संघटना  नेत्यांसह सर्वाँची *स्वतंत्र वैचारिक पातळी* वेगवेगळी आहे. ते  आपल्या संघटनांचे *अस्तित्वास धक्का* न लावता समाज हिताचे *किमान समान कार्यक्रम* प्रस्थापित करण्यासाठी *एकत्र* येण्यास काहीच *अडचण* नाही.

*समस्या तो सबके पास है!उससे लड़ना, जूझना पड़ता है! उसके बावजूद समाज को कुछ अच्छा देनेका प्रयास किया जाता है! तो क्या आप ऐसा नही सोच सकते...?*

आतापर्यंत *मान - अपमान, हेकेखोर, मीपणा व शल्य* झालेल्या गोष्टी उगळण्यापेक्षा ते बाजूला ठेवून कामे करत राहिल्यास नक्कीच *समाजाची प्रगती* निश्चित होईल‌

आपल्या सर्वांच्या आयुष्यात *यश व अपयश* आले आहेत. आपण समाजाचे *आशेचे किरण* आहोत. आपण ज्या समाजात राहतो, वागतो आणि आहोत. त्या समाजासाठी आपल्या *सर्व नेते, सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी आणि प्रमुख  कार्यकर्ते* इ. एकत्र येऊन समाजाचे *सत्कर्म* करावे, अशी अजून ही *आशा* लावून तमाम वडार बंधू भगिनीनी *देव पाण्यात* ठेवले आहेत. त्यासाठी *आक्रोश* करताना दिसत आहेत.

कोणाकडे *ज्ञान* आहे, पण *पैसा* नाही. तर कोणाकडे *पैसा संपत्ती* असते तर *ज्ञानाचा अभाव* आहे.
काही *समाज विघातक* असतात, पैसे असणारे व त्यांचे मागे *स्वार्थी* विचार असणारी मंडळी मागे *उदो, उदो* करीत असतात. पूर्ण *अंध भक्त* बनतात. इतरांचे *चांगले कार्य* त्यांचे डोळ्यात खुपते. 
    अशा लोकांना त्यांना त्यांचं काम *आदर्श* वाटतं असते  ते *पक्के खेकडा* वृतीचे ते बनले असतात. त्यांना *समाजाचे देणे - घेणे* नाही. आपण ज्यांना *लक्ष्य* करतो. समाजातील त्याला काही घटक *जबाबदार* आहेत.
      अशा *संकुचित विचार व स्वार्थी वृत्ती* लोकांना समाजाने *दूर ठेवणे* आवश्यक आहे.
आपण फार महत्त्व देऊ नये, *जो समाज हित की बात करेगा, समाज को सही दिशा दिखायेगा, उसी को समाज अपनाएगा*
असा विचार करून सर्व *वडार समाज संघटना/ संस्था* एका ठिकाणी येऊन आपले विचार व पुढील दिशा ठरविण्यासाठी *वडार गोलमेज परिषद* आयोजित करण्यासाठी वडार समाजातील सध्याची *मोठी संघटना* (ज्या संघटना/संस्थाचे अनेक शाखा आहेत) 
      त्यातून काही तरी *नवीन ठोस मार्ग* मिळेल अशी *आशा* आहे.
    

*उपाय योजना काय करता येईल?*

राज्यातील आपल्या जातीच्या सर्व संघटनांनी एकत्र यावे आणि त्या सर्वांचा मिळून एक *महासंघ असावा.*
       याबाबतचे,  मला माहीत असलेले शासकीय नियम आणि अनुभव आणि आपल्या  समाजातील विविध संघटनाची सद्य स्थिती , त्यांची सध्याची कार्यपद्धती  हे लक्षात घेऊन माझे खालील प्रमाणे विचार/ मत सादर करीत आहे. 
   यावर खरोखरच समाज हिताचा कळकळीने विचार करणारानी जरूर विचार करावा.
    १) आपण सध्या अस्तित्वात असलेल्या विविध संघटनांचे एकत्रीकरण करून  ( अशा आपल्या संघटनेचे विलीनीकरण अन्य कोणत्या संघटनेत करायला कोणीही तयार होणार नाही).  किंवा त्या स्वतंत्ररीत्या आहे तशा राहू देऊन वेगळी अशा प्रकारची महाराष्ट्र स्तरावर *महाराष्ट्र वडार सेवा  समन्वय महासंघ* स्थापन करून त्याचे रजिस्ट्रेशन करू शकतो . पण हा देखील महासंघ सध्या आहे त्या विविध संघांसारखा होता कामा नये .याची मात्र या  महासंघात सामील होणाऱ्या शीर्षस्थ  नेत्यांनी /पदाधिकाऱ्यांनी पहिल्यापासून काळजी घेणे गरजेचे आहे.
  २) हा महासंघ पूर्णतः सामाजिक कार्यासाठी वाहिलेला असावा.यात कोणत्याही राजकीय पक्षाचे   नेते पदाधिकारी जरी असतील , तरी या महासंघाच्या कार्यात सहभागी होत असताना त्यांनी आपापल्या *पक्षाची झूल  बाजूला ठेवून  स्वतः प्रथम वडार आहोत (नंतर आपला राजकीय पक्ष ) हे लक्षात घेऊन वडार समाजाच्या कल्याणासाठीच्या कार्यक्रमात /उपक्रमात/ चळवळीत /आंदोलनात  स्वतः आणि त्यांचे अनुयायी यांनी हिरीरीने पुढाकार घेऊन सहभागी होणे आवश्यक असेल.* अशी या महासंघाच्या घटनेत स्पष्ट तरतूद असावी.
३) अशा समन्वय महासंघाच्या कार्यकारणीत प्रत्येक जिल्ह्यातील शासन नोंदणी कृत संघटनांचे एक किंवा दोन पदाधिकारी असतील अशी व्यवस्था असावी.
४) शासन स्तरावरील कोणत्याही अधिकाऱ्याकडे किंवा खाते प्रमुखांकडे अथवा मंत्रालयातील मंत्र्यांकडे जर एखाद्या विषयावर चर्चेसाठी बोलवायचे असेल तर शासनाचे स्पष्ट  नियम आहेत की , फक्त नोंदणीकृत नियमिता सात्यता संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनाच अशा प्रकारच्या चर्चेला बोलावून घेतले जाते.
५) नोंदणीकृत नसलेल्या कोणत्याही संघाने संघटनेने अथवा जनसमुदायाने केलेले आंदोलन किंवा चळवळ  ही बेजबाबदार , नेतृत्वहीन  झुंड किंवा  टोळी किंवा जनसमुदाय समजून याची दखल शासन दरबारी घेतली जात नाही . अशा प्रकारची चळवळ किंवा आंदोलन पोलिसांच्या मदतीने शमवले जाते. तसे कायदे आहेत.
६) सध्या राज्यभर जिल्हास्तरावर किंवा मोठ्या शहरात ज्या काही संघटना आहेत , त्या संघटनेचे पदाधिकारी हे कोणत्याही राजकीय पक्षाचे असले तरीही त्यांचे राजकीय विचार , आपल्या पक्षाचे विचार,   सोबत घेऊन ते अशा नवीन स्थापन होऊ घातलेल्या  महासंघात सामील होऊ शकतात, एकत्रित येऊ शकतात आणि ज्या ज्या वेळी काही मागण्या आंदोलन चळवळ महासंघाने उभारली असेल , तर त्या त्या पक्षाच्या नेतृत्वाकडे अशा प्रकारच्या मागण्या ते मांडून एकंदरीत सर्व पक्षांच्या आमदाराकडे किंवा नेत्यांकडे अशा मागण्या जाऊ शकतात त्यामुळे विविध राजकीय पक्षाचे नेते देखील या महासंघात समाविष्ट असणे हे फायद्याचेच आहे.*मात्र महासंघाच्या शीर्षस्थ नेतृत्वाचे आदेश/ निर्देश हे अंतिम राहतील अशी भूमिका त्या सर्वांनी मान्य करूनच यामध्ये सामील होणे अभिप्रेत असावे.*
७) सध्या राज्यभरातून असलेल्या विविध संघटना /संघ यामध्ये अत्यंत विद्वान , चिंतनशील , उच्चशिक्षित ,विचारवंत, साहित्यिक , चळवळीचा अभ्यास असणारे , केवळ समाज हित हेच ध्येय ठेवून निस्वार्थपणे प्रसंगी स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून काम करणाऱ्या नेतृत्वाची उणीव अशा संघटनातून दिसून येते.
*८) नव्याने महासंघ स्थापन करायचा असेल तर त्यासाठी आपल्या समाजातील राज्यभरातील १) चिंतनशील विद्वान ,२) अभ्यासू, ३) निस्वार्थ ४) ध्येयनिष्ठ, ५) राजकारणा पलीकडे असलेल्या राज्यस्तरीय सेवानिवृत्त उच्च अधिकारी  (जे समाजासाठी पूर्ण वेळ देऊ शकतील असे ) आणि  ६)साहित्यिक , ७)वकील, ८) कायदे तज्ञ यांचा *एक थिंक टॅंक*  (सल्लागार मंडळ RSS चे धर्तीवर ) या महासंघाच्या मागे दीपस्तंभ सारखा उभा असावा. 
   हा थिंक टॅंक समाजातील अगदी तळागाळातील झोपडपट्टीतील , खाणीत काम करणाऱ्या कामगारापासून ते मोठ्या कॉन्ट्रॅक्टर पर्यंत चे जे प्रचलित ज्वलंत प्रश्न असतील त्याबाबतच्या मागण्या , चळवळीची दिशा,  चळवळीचे स्वरूप चळवळीची व्याप्ती. इत्यादी बाबतचा कालबद्ध कृती कार्यक्रम महासंघाच्या पुढे वेळोवेळी ठेवेल आणि कार्यकारिणीने याबाबतचा निर्णय घेऊन सविस्तर चळवळ आंदोलन प्रत्येक जिल्ह्यातील गाव खेड्यापर्यंत राबवून मागण्या मान्य करवून घ्याव्यात. अशी प्रभावी यंत्रणा आवश्यक असावी.

९) असे सल्लागार मंडळ /थिंक टॅंक किंवा सुकाणू समिती , तिची रचना , स्वरूप कार्यपद्धती , अधिकार क्षेत्र मर्यादा , यातील सभासदांची निवड पद्धती , निवडीचे अधिकार इत्यादी बाबी देखील या महासंघाच्या घटनेतच समाविष्ट असाव्यात. 
१० )    *वरील सर्व विचार हे कागदावर अत्यंत आदर्शवत जाणवतात .*
  प्रत्यक्षात फिल्डवर याचे अस्तित्व उतरायचे असेल तर प्रथमदर्शनी  सर्व नोंदणीकृत संघटनाचे पदाधिकारी काही विद्वान विचारवंत , सेवा निवृत्त  अधिकारी , साहित्यिक ,कायदे तज्ञ साहित्यिक  इत्यादींची *एक सहविचार सभा* आयोजित करून त्यामध्ये एखादी *एडवोक कमिटी* नेमून त्या कमिटीला घटना तयार करणे , रजिस्ट्रेशन करणे , कार्यकारिणी निवडणे , सल्लागार मंडळ निवडणे , इत्यादींचे अधिकार एक मुखाने प्रदान करावे लागतील , त्यासाठी पुरेशी आर्थिक  तरतूद उपलब्ध असणे , उभा करणे  ते राज्यातील सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व संघटनांनी  मान्य करणे या बाबी या  सभेत अंतिम करणे योग्य वाटते. म्हणजे हे विचार व्यावहारिकरीत्या जमिनीवर राबवता येऊ शकतील .
   ११)   अशी  सर्व संघटनांची *प्रारंभिक पहिली सविचार सभा*  भरवण्याची जबाबदारी सध्या राज्यात जिच्या  बहुसंख्येने विविध  शाखा आहेत अशा सर्वात मोठ्या असणाऱ्या संघटनेने पुढाकार घेऊन स्वीकारणे आणि त्यास अन्य सर्व संघटनांनी  *(खरोखर मनापासून एकत्र येण्याची आंतरिक आस असेल तर )* प्रतिसाद देणे आवश्यक वाटते. 
१२) आपल्या जातीच्या सर्व संघटनांना एकत्रित करण्याचे  सहविचार सभेस निमंत्रित सर्वजण येणार असतील तरच अशा सभा आयोजित करणे उपयोगाचे आहे .अन्यथा आयोजन करणाऱ्यांचा श्रम , वेळ , पैसा , कार्यक्षमता नाहक व्यर्थ जाईल  आणि पुन्हा *येरे माझ्या मागल्या* अशा पद्धतीने आपल्या समाजाची दैन्यावस्था  "याची देही याची डोळा" फक्त पाहत राहणे आणि केवळ व्हाट्सअप वर आपली आपली मते पोटतिडकीने मांडणे एवढेच घडेल.
close