shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जानपीर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्नेहमेळावा उत्साहात पार पडला...!

डोंगरकिन्ही/शिर्डी एक्स्प्रेस वृत्तसेवा -
 जानपीर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नाळवंडी/कारेगाव ता. पाटोदा, जि. बीड येथे इयत्ता १० वी बॅच (२०११-१२ )चा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या प्राचार्या शेख मॅडम होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षक श्री. खेत्रे सर व प्रा. डॉ. जब्बार शेख सर होते.

     कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या शुभहस्ते विद्येची देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले तसेच विद्यालयाचे दिवंगत शिक्षक श्री भालेकर मुकुंद गुलाबराव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  त्यानंतर २०११ -१३ या शैक्षणिक वर्षात इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यातर्फे सर्व शिक्षक प्राध्यापक व वृंदाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्याचबरोबर विद्यालयाच्या वतीने दहावीच्या बॅचमधील सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयातर्फे स्वागत करण्यात आले.

     सर्वप्रथम दहावीच्या विद्यार्थ्यांनी या विद्यालयाच्या योगदानामुळे आम्ही यशस्वी होऊ शकलो याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले .यामध्ये सर्व शिक्षक प्राध्यापक यांचे फार मोठे योगदान आहे याबद्दल गौरवोद्गार काढले. या कार्यक्र माचे श्री साबळे सर यांनी उत्कृष्ट असे नियोजन केले.
    या कार्यक्रमाचे प्रमुखअतिथी श्री.खेत्रे सर यांनी विद्यालयातील यशस्वी माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. प्रा. डॉ.जब्बार शेख सर यांनीही आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना योग्य दिशा देत प्रेरणादायी विचार मांडले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्या शेख मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शाळेत राबवले जाणारे विविध उपक्रम स्पर्धा परीक्षा, विभाग स्तरावर गेलेले खेळाडू शाळेसाठी संस्थेकडून वेळोवेळी मिळणारे सहकार्य याबद्दल,बहुमोल मार्गदर्शन करून, "शाळेत नवनवीन उपक्रम राबवून शिक्षण अधिक सर्वांगीण बनवण्यात येईल," असा विश्वास दिला.

    या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी विनोद डिसले ,अवधूत गुजर, करण पाटील, सय्यद नगीना, शितल डोके, शितल पठाडे, किरण साबळे, मयुरी गुजर, संतोष रणसिंग, पडघन छाया, मुक्ता गुजर, शीतल निंबाळकर, भाऊसाहेब रंधवे, परविन शेख, निवृत्ती गुजर, मच्छिंद्र पन्हाळकर ,आबासाहेब देवडे, सचिन गुजर ,भागवत जरांडे, सुंदर कठाळे, सोमीनाथ गुजर ,चांद शेख ,राम गुजर, शिलावती पन्हाळकर ,शामल ववंडकर, बाजीराव जाधव आदी विद्यार्थी उपस्थित होते. 
या विद्यार्थ्यांच्या वतीने इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला. शेवटी सर्व शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांना विद्यार्थ्यांच्या वतीने प्रीती भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 
    या सुंदर अशा कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन किरण साबळे या विद्यार्थिनींनी केले तर उपस्थितांचे आभार अवधूत गुजर यांनी मानले या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी शिक्षक प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले यामुळे हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
close