श्रीरामपुर [ प्रतिनीधी ]
शिर्डी या ठिकाणी शासकिय विश्राम गृह येथे उत्तर आहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने भाजपा संघटन पर्व प्रवास दौऱा संपन्न भाजपा महामंत्री विजुभाऊ चौधरी तसेच भाजपाचे कार्यालयीन प्रमुख रवीजी अनासपुरे साहेब यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह शिर्डी येथे महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक संपन्न करण्यात आली
कार्यक्रमाच्या अध्यक्ष माजी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीमध्ये
यावेळी भाजपा पदाधिकारी मंडल अध्यक्ष निवडणे तसेच वेगवेगळ्या कमिटीचे प्रमुख निवडणे संघटन परवाचा प्रवास करणे बूथ कमिटी मजबूत करणे, बूथ अध्यक्ष ची निवड करणे त्याचप्रमाणे शासनाच्या महाराष्ट्र सरकारच्या योजना तळागाळापर्यंत गोरगरिबांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवणे सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी आणि कष्टकरी वर्गाला शासकीय योजनेचा लाभ मिळतो की नाही अशा विविध विषयांवर यावेळी संघटन महामंत्री विजयभाऊ चौधरी तसेच रवीजी अनासपुरे साहेब यांनी मार्गदर्शन केले
त्याच प्रमाणे उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व मंडळातील कार्यक्रमाचा लेखाजोखा जिल्हाध्यक्ष नितीनभाऊ दिनकर यांच्या वतीने सादर करण्यात आला
यामध्ये प्रमुख्याने ऑफलाइन सदस्य व सक्रिय सदस्य तसेच बूथ कमिटी गठीत करणे जिल्ह्यामध्ये सदस्य नोंदणीची झालेले आकडेवारी तसेच जिल्ह्यामध्ये सक्रिय सदस्यांची नोंदणी व विविध महत्त्वाच्या मुद्द्यावर सर्व लेखाजोखा जिल्हाध्यक्ष नितीनभाऊ दिनकर यांनी यावेळी सादर केला,
सदर बैठकीला निवडणूक प्रमुख पदाधिकारी प्रभारी श्री राजाभाऊ गोंदकर, सुभाष वाहाडणे, रवीकाका बोरावके, अशोक पवार, योगेश गोंदकर, किरण बोराडे, सतीश सौदागर, मारुती बिंगले, ऋषिकेश शेटे, योगीराज परदेशी, बंडूकुमार शिंदे, नरेश सुराणा, बाळासाहेब गाडेकर, भाऊसाहेब वाकचौरे, हंसराज बत्रा, आनंद बुधेकर, तसेच सर्व मंडळातील भाजपाचे मुख्य पदाधिकारी उपस्थित होते एक ते दोन दिवसांमध्ये उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व मंडळाच्या निवडी (मुलाखती) होणार असून 6 एप्रिल भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करावा असे आवाहन सुभाष वाहडणे यांनी केले,
कार्यक्रमाचे प्रस्ताविक अशोक पवार यांनी केले तर बंडूकुमार शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले