इंदापूरात श्री ज्योतिबा यात्रा उत्साहात
इंदापूर : चैत्र पौर्णिमा वार शनिवार दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी सकाळपासून दख्खनचा राजा श्री ज्योतिबा यात्रेला उत्साहात सुरुवात झाली. यात्रेसाठी सोलापूर , करमाळा, माढा, टेंभुर्णी फलटण माळशिरस तसेच इंदापूर तालुक्यातील पंचक्रोशीतील व नगर जिल्ह्यातून जोतिबा भक्त मोठ्या प्रमाणात यात्रेसाठी उपस्थित होते मनोभावे भक्तांनी कुलदैवत ज्योतिबा देवाचे दर्शन घेतले,दिवसभर लाखो भाविकांनी ज्योतिबाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. दुपारी ४ वाजता जोतिबाची आरती होऊन जोतिबाचा घोडा ग्राम प्रदिक्षणेसाठी सवाद्य मिरवणुकीस सुरुवात झाली .
यात्रेसाठी श्री ज्योतिबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरविंद वाघ, नगरसेवक गोरख शिंदे, कैलास कदम, बाबासाहेब घाडगे, गोरख कदम . यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष अतुल (वस्ताद) शेटे पाटील, उपाध्यक्ष संतोष जाधव, खजिनदार पोपट उंबरे, सहखजिनदार तानाजी देशमुख, कार्याध्यक्ष अभिजीत अवघडे, अक्षय सुर्यवंशी ,मंदिराचे पुजारी रोहित जाधव, संदिप जाधव, अश्विन जाधव , मंगेश औताडे, हमीदभाई आत्तार , महादेव चव्हाण, भारत बोराटे , बाळासाहेब उंबरे, बबन सुर्यवंशी, जोतिराम सुर्यवंशी यांनी यात्रा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले अशी माहिती हमीद आतार यांनी दिली.