सेनगांव/विश्वनाथ देशमुख
हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील वयोवृद्ध व श्रावण बाळ योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची त्यांच्या हक्काच्या अनुदानापासून हे आधार बेस पेमेंट म्हणजे डीबीटी अंतर्गत मिळणार असल्याने या लाभापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी तहसील प्रशासनच्या वतीने मंडळ निहाय शिबिराचे आयोजन करून लाभार्थ्यांचे आधार कार्ड व खाते क्रमांक तसेच मोबाईल क्रमांक लिंक करून महाडीबीटी म्हणजे आधार बेस पेमेंट करून घेतल्या जात आहे त्यामुळे तालुक्यातील निराधार योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पहावयास मिळत आहे.
सेनगाव तालुक्यात निराधार सह श्रावण बाळ व वयोवृद्ध या योजनेची लाभार्थी संख्या मोठी असून यामध्ये अनेक लाभार्थी अतिशय वयोवृद्ध व अपंग असल्याकारणाने त्यांना आपल्या घराच्या बाहेर पडणे शक्य नसल्याने अशा गरजूवंत व पात्र लाभार्थी शासनाच्या मिळणाऱ्या अनुदानापासून वंचित राहू नये यासाठी सगायो विभागाच्या पुढाकारातून तालुक्यात मंडळ निहाय निराधार लाभार्थी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्यामध्ये सेनगाव, पानकनेरगाव,पुसेगाव,बाभुळगाव हत्ता,आजेगाव,साखरा, गोरेगाव आदी मंडळामध्ये शिबिर घेऊन त्या मंडळातील पात्र लाभार्थी यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून त्यांचा मोबाईल नंबर आधारशी जोडण्यात आला असून यामुळे निराधार लाभार्थ्यांना शासनाकडून दिल्या जाणारे अनुदान यासंबंधी त्यांना त्यांच्या मोबाईलवर माहिती उपलब्ध होणार असून तसेच खाजगी इसमांकडून लाभार्थ्याची होणारी आर्थिक लूट थांबणार असल्याने लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहावयास मिळत आहे सरकारने योजना अनुदान हे आधार बेस पेमेंट म्हणजे महा डीबीटी अंतर्गत देय झाल्याने लाभार्थ्यांना होणारी गैरसोय व आर्थिक लूट यांच्यापासून कायमची मुक्तता होत आहे त्यामुळे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी अभिनव गोयल उपविभागीय अधिकारी समाधान घटूकडे यांच्या आदेशाने सेनगांव तहसीलदार सखारामजी मांडवगडे यांच्या मार्गदर्शनाखाली संगायो विभाग प्रमुख विनोद अंभोरे,संगणक ऑपरेटर संजयजी शिरसाट सुकळीकर संगणक ऑपरेटर नितीन चिटणे यासह त्या त्या मंडळाचे मंडळ अधिकारी व तलाठी यासह गावातील सरपंच पोलीस पाटील व प्रतिष्ठित नागरिक यांच्यासह लाभार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
उर्वरित लाभार्थ्यांनी आपले मूळ कागदपत्र संगायो शाखेत जमा करावेत:-विनोद अंभोरे
सेनगांव तालुका प्रशासनाकडुन निराधार लाभार्थी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते त्या अनुषंगाने लाभार्थ्यांनी दिलेल्या कागदपत्रा आधारे आधार लिंक व मोबाईल नंबर यासह महाडीबीटी आधार बेस पेमेंट या प्रणाली अंतर्गत निराधार लाभार्थ्यांना अनुदान दिल्या जाणार असल्याने या योजनेचे उर्वरित लाभार्थ्यांनी आपली मूळ आधार कार्ड,खाते क्रमांक व मोबाईल नंबर इत्यादी सह संगायो शाखेत जमा करावी असे आवाहन संगायो शाखेचे प्रमुख तथा अव्वल कारकून विनोद अंभोरे यांनी केले आहे.
शासनाने शासकीय अनुदान महाडीबीटी अंतर्गत देणे बंधनकारक केले असून त्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांनी आपले आधार अपडेट करणे गरजेचे असून आधार कार्ड खात्याशी लिंक व मोबाईल नंबर जोडणे बंधनकारक झाले आहे त्या कारणाने लाभार्थ्यांना दिले जाणारे अनुदान हे पारदर्शक व विना विलंब मिळणार असून या योजनेच्या लाभार्थ्यांना होणारी गैरसोय व आर्थिक लूट यामधून कायमची मुक्तता होणार असल्याने लाभार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहावयास मिळत आहे उर्वरित लाभार्थ्यांनी आपले मूळ कागदपत्र संगायो शाखेत तात्काळ जमा करावीत जेणेकरून तालुक्यातील कुठलाही गरजवंत व पात्र लाभार्थी अनुदानापासून वंचित राहणार नाही यासाठी सगलाभापाप्रयत्नशील असल्याचे अव्वल कारकुन विनोद अंभोरे यांनी सांगितले.