नाभिक दुकानदार संघटनेची नवीन कार्य कारणी जाहिर व सलुन दरवाढीबाबत चर्चा
वरुड ( जि.अमरावती) प्रतिनिधी:
संत्रा नगरी वरुड शहरातील साई मंदिर जवळील संत श्री नगाजी महाराज समाज भवन याठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त नाभिक दुकानदार बांधवांचे चर्चा सत्र घेण्यात आले यावेळी सर्व प्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली व संत नगाजी महाराज यांच्या मुर्तीचे पुजन करण्यात आले त्यांनंतर वरुड शहरातील सलुन दुकानदार बांधवाच्या सहमतीने वरुड नाभिक दुकानदार संघटनेच्या नवीन शहराध्यक्ष म्हणून रितेश धानोरकर उपाध्यक्ष म्हणून विजय राऊत व शुभम साखरकर तर सचिवपदी मंगेश येवतकर यांची निवड करण्यात आली. यावेळी १७ सभासदांची कार्यकारणी जाहिर करण्यात आली या मध्ये सह सचिवपदी निलेश साखरकर, सल्लागार म्हणून पंकज कावलकर, विलास साखरकर व ज्येष्ठ सलागार म्हणून नारायणराव द्रवेकर आणी सदस्य म्हणून मनोज कावलकर, गणेश सिरस्कर, मोहित राजेश मिसळकर अतुल ससनकर, गुडडू सूर्यवंशी, विजय निभोरकर, विश्वेश्वर धानोरकर, उमेश शिराळकर, दिपक पापडकर, निलेश धानोरकर यांची निवड करण्यात आली. येत्या काळा मध्ये नाभिक संघटनेला अधिक बळकट करण्या करिता या कार्यकारणी चे गठण करण्यात आले.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामकृष्ण शिरूळकर यांनी सर्व नवीन कार्यकारणी तील सभासदांना संघटतेचे महत्व समजावून सांगितले तर संघटनेचे सचिव प्रविण सावरकर यांनी संघटनेचे फायदे व नियम समजावून सांगितले. "विना संघटना नाही उद्धार जिवनाचा " हा मुलमंत्र या प्रसंगी देण्यात आला.
या वेळी प्रामुख्याने उपस्थिती म्हणून रामकृष्ण शिरुळकर,रमेश माथुरकर, राजु मिसळकर, प्रविण सावरकर, भालचंद्र चौधरी, रमेश आसोलकर, अशोक साखरकर, सुधाकर धानोरकर, शेषराव आजनकर,विजय निभोरकर, रामकुष्णा द्रवेकर, वेदांत निभोरकर, प्रविण ससनकर, तनमय शेळके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या वेळी रामकृष्ण शिरुळकर यांनी प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.
यावेळी सर्व नवयुक्त पदाधिकारी यांचे संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा जय जयकार करण्यात आला.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार प्रविण सावरकर
वरुड जि.अमरावती
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मिडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर -9561174111