shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भिमाई आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत.**(प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न)*

*भिमाई आश्रमशाळेत विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत.*
*(प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न)*
*इंदापूर*   :- येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक,माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा, मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात  शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या सुरुवातीलाच प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी नवोगत विद्यार्थी व पालकांचे आश्रमशाळेच्या वतीने संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे, मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवेंसह शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत करत एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली. सदैव नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या आश्रमशाळेत पाल्यांसह पालकांचा देखील स्वागत सोहळ्याप्रसंगी आनंद द्विगुणित झाला. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य,वह्या, पुस्तके इत्यादींचे वाटप संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे (काकी), सचिव ॲड.समीर मखरे यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागतासाठी शैक्षणिक संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारावर फुगे, फुलांचे गुच्छ लावून, आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. पालकांसाठी उत्तम नाश्त्याची सोय करण्यात आली होती. प्रसिद्ध व्याख्याते नानासाहेब चव्हाण, ॲड. समीर मखरे यांनी मार्गदर्शन केले.तर हिरालाल चंदनशिवे, सविता गोफणे, जावेद शेख, लता सातपुते यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे यांनी विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सवाच्या व नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते सुरज धाईंजेंसह विद्यार्थी, पालक,  शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.प्रास्ताविक साहेबराव पवार, सूत्रसंचालन नानासाहेब सानप, आभार रेश्मा झेंडे यांनी केले.
close