वडाळा महादेव [ प्रतिनीधी ] नगरपालिका शाळा क्रमांक -३ गोंधवणी श्रीरामपूर या ठिकाणी दिनांक- १६ जून रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार माननीय श्री. भाऊसाहेब कांबळे यांच्या शुभ हस्ते इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे फुगे व पुष्पगुच्छ देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले. तसेच इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले.
यावेळी माजी आमदार माननीय श्री भाऊसाहेब कांबळे यांनी विद्यार्थ्यांसाठी वही तसेच शालेय साहित्याचे वाटप करत नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी कांबळे साहेबांच्या वतीने मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमासाठी माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, शिवसेना तालुका प्रमुख संतोष डहाळे तसेच सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ भोसले श्री सुनिल फुलारे तसेच ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सरला ताई खंडागळे, उपाध्यक्ष संगीता देवकर व इतर सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका स्मिता गायकवाड, राजेंद्र गायकवाड, प्राची लोळगे, सचिन डोखे यांनी खूप परिश्रम घेतले..कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र गायकवाड यांनी केले. प्राची लोळगे यांनी आभार मानले.