shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

यशाची हिरकणी ठरल्या विद्यार्थिनी! शास्त्री फार्मसीचा निकाल १००%.

शास्त्री फार्मसीचा निकाल १००% — गुणवत्तेचा नवा आयाम!

 द्वितीय वर्षात ममता पाटीलने सलग दुसऱ्यांदा पटकावला पहिला क्रमांक; बहुतांश गुणवंत मुलींचा निकालात दबदबा.

एरंडोल :-पळासदळ येथील शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीने २०२५ च्या डिप्लोमा फार्मसीच्या उन्हाळी परीक्षेत शंभर टक्के निकाल देत यशाचा नवा इतिहास रचला आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने नुकतेच निकाल जाहीर केले असून, प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत संस्थेचे नाव उज्ज्वल केले.

प्रथम वर्षामध्ये पाटील भाग्यश्री संजय हिने ६८.८०% गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. पवार भाऊसाहेब किसन याने ६८.१०% गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला, तर धनगर रुचिता विजय आणि पाटील महेंद्र आत्माराम यांनी ६८% गुण मिळवत संयुक्तरित्या तृतीय क्रमांक पटकावला.

द्वितीय वर्षात ममता लक्ष्मण पाटील हिने ८२.१८% गुण मिळवत सलग दुसऱ्या वर्षी पहिला क्रमांक पटकावून आपले वर्चस्व सिद्ध केले. लोहार प्रिया मच्छिंद्र हिने ७७.६४% गुण मिळवत दुसरा क्रमांक तर पाटील वैष्णवी देविदास हिने ७५.६४% गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला.

या घवघवीत यशामध्ये विद्यार्थिनींनी आघाडी घेतल्याचे विशेष लक्षवेधी ठरले आहे. त्यांच्या मेहनतीला, सातत्याला आणि गुणवत्तेला सलाम करत संस्थेच्या सचिव सौ. रूपा शास्त्री, प्राचार्य डॉ. विजय शास्त्री, उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले

close