shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवा निमित्त पडस्थळ येथे नेत्र तपासणी शिबिर संपन्न.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवा निमित्त पडस्थळ येथे नेत्र तपासणी शिबिर संपन्न.
इंदापूर : यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती साजरी होत आहे. शासन स्तरावरून महाराष्ट्रभर या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे औचित्य साधून पडस्थळ ग्रामस्थ व मगर एक्सीडेंट आणि डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पडस्थळ येथे नेत्ररोग तपासणी व उपचार शिबिर पार पडले. 100 पेक्षा जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. मगर हॉस्पिटलच्या नेत्ररोग तज्ञ डॉ.गीता मगर, ऑप्टोमेट्रिस्ट रविराज चव्हाण यांनी रुग्णांची नेत्र तपासणी, काचबिंदू, मोतीबिंदू तपासणी केली. या मोफत नेत्र तपासणी शिबिरात गरजू रुग्णांना मोफत औषध उपचार करण्यात आले‌ त्याचबरोबर अत्यंत माफक मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी व चष्मे वाटप करण्यासाठी सहकार्य केले. 
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मार्केट कमिटीचे माजी संचालक बळीराम बोंगाणे यांनी केले. 

यावेळी उपसरपंच प्रियांका गव्हाणे, ग्रामपंचायत सदस्या विद्याताई बोंगाणे, रेश्माताई रेडके, स्वातीताई कोळेकर, रसीकाताई सरडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. 

या शिबिराचा 113 लाभार्थ्यांनी लाभ घेतला. या कार्यक्रमासाठी रेडिओलॉजी टेक्निशियन ओंकार सुतार, परिचारक अजय कडाळी,मुकेश चोपडे, आशा वर्कर वर्षाताई मुसळे, खंडेराव कोकरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
close