एन.ई.एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या
दोन कबड्डी खेळाडू ५% आरक्षणासाठी पात्र.
इंदापूर: महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने १ ली १८ वर्षाखालील राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा १४ जून ते १८ जून
२०२५ या कालावधीमध्ये बालेवाडी (पुणे) या ठिकाणी संपन्न झाल्या.
या स्पर्धेत पुणे ग्रामीण मुलींच्या संघाने अहिल्यानगर,पालघर ,धुळे, सातारा, नाशिकशहर,जालना ,अशा तुल्यबळ संघाना पराभूत करून अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला . यांनतर अंतिम सामन्यात पिंपरी चिंचवड संघासोबत लढतीत झाली यामध्ये पुणे ग्रामीण संघाने विजेते पद मिळवले.या स्पर्धेत पुणे ग्रामीण संघात एन.ई.एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर च्या दोन खेळाडू
१) सुहानी गणेश माने २) प्रणाली पांडुरंग माने ह्या खेळाडूचा व संघ व्यवस्थापक म्हणून...सौ.सोनाली शेंडे मॅडम यांचा पुणे ग्रामीणच्या संघात समावेश होता.
राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत १८ वर्ष वयोगटात प्रथम पारितोषिक मिळवून भविष्यासाठी खेळाडूला मिळणाऱ्या ५% आरक्षणासाठी त्या पात्र ठरल्या आहेत.
ज्यामुळे भविष्यातील शासकीय नोकरीच्या अनुषंगाने त्यांना राखीव आरक्षणामध्ये (५%) विशेष संधी मिळणार आहे. त्याबद्दल विद्यालयामध्ये या दोन्ही खेळाडू विद्यार्थिनींचे विद्यालयाच्या वतीने संस्था व शिक्षक स्टाफ त्यांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन अभिनंदन करण्यात आले.