shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रयतमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणाचे आयोजन

श्रीरामपूर / प्रतिनिधी:
जुनी अध्ययन अध्यापन प्रक्रिया सोडून नवीन तंत्रज्ञानावर अध्यापन व्हावे, या हेतूने रयत शिक्षण संस्थेने आपल्या सर्व शाखांमध्ये आधुनिक शिक्षणाचे पाऊल ओळखत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानयुक्त शिक्षण सुरू करण्यासाठी प्रत्येक शाखातून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे. 
आधुनिक काळाची गरज ओळखून तसेच विद्यार्थ्यांना भविष्यात तंत्रज्ञानावर आधारित चांगल्या नोकरीच्या संधी प्राप्त व्हाव्यात, या हेतूने संस्थेचे अध्यक्ष मा.खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सूचनेनुसार व चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व माहिती व्हावी, या उद्देशाने संस्था पातळीवर हे प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील येत्या १६ जून पासून या सहशालेय उपक्रमाची अंमलबजावणी होणार आहे. या अनुषंगाने दि. ९ ते १३ जून २०२५ या कालावधीत संस्थेच्या विविध शाखातून शिक्षकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय)चे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. 
सदरचे प्रशिक्षण संस्था अंतर्गत विशेष प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांकडून इतर शिक्षकांना दिले जाणार आहे. संस्थेचे अहिल्यानगर येथील उत्तर विभागीय कार्यालयामधील एकूण ८३ शाखांमधील गुरुकुल व मिनी गुरुकुल शाखेतील शिक्षकांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. काही मिनी गुरुकुल शाखातील शिक्षकांना शेजारच्या गुरुकुल शाखांमध्ये हे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे. रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख,  उच्च शिक्षणचे सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे, सहसचिव माध्यमिक बी. एन. पवार, सहसचिव ऑडिट डॉ. राजेंद्र मोरे, उत्तर विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी बाबासाहेब नाईकवाडी, सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे व विभागीय गुणवत्ता कक्ष मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण विभागीय पातळीवर आयोजित केलेले आहे.

*वृत्त विशेष सहयोग
डॉ.शरद दुधाट (सर) श्रीरामपूर 
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मिडिया सर्व्हिसेस
 श्रीरामपूर - 9561174111
close