अकोले / ओतूर ( प्रतिनिधी ) :- जगद्गुरु श्री संत तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी (३७५ वर्ष) सदेह वैकुंठ गमन सोहळा समिती ओतूर व वारकरी संप्रदायाच्या वतीने वीर जवान संदीप गायकर यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयाचा कृतज्ञता निधी सुपूर्द करण्यात आला.
जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे, ह.भ.प. गंगाराम महाराज डुंबरे, ह.भ.प.दीपक महाराज देशमुख, ह.भ.प.राजेंद्र महाराज सदगीर, विनायक तांबे, बाळासाहेब गायकर यांचे उपस्थितीत वीरमाता सरुबाई गायकर, वीरपिता पांडुरंग गायकर व वीरपत्नी दिपाली गायकर यांचे कडे हा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी (३७५) सदेह वैकुंठ गमन सोहळा समिती श्रीक्षेत्र ओतुर येथे पार पडला. कीर्तनात श्री गुरु बंडातात्या कराडकर यांनी आपण देशभक्तांचे कृतज्ञता म्हणून काही देणे लागतो म्हणून सप्ताह पार पडल्यावर निधी शिल्लक राहिल्यास देशाच्या सैन्यासाठी आपण निधी समर्पित करावा असे आवाहन केले, त्याला प्रतिसाद देत सप्ताहाचे मुख्य मार्गदर्शक ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे माऊली यांनी मान्य केले. निधी सरकारला देण्याऐवजी सप्ताहाच्या कार्यक्षेत्रातच दहशतवाद्यांसोबत लढताना वीरगतीला प्राप्त झालेल्या वीरजवानाच्या परिवाराला द्यावे असे ठरले.
२२ मे २०२५ रोजी जम्मू-काश्मीर मधील किस्तवाड येथे दहशतवाद विरोधी कारवाई दरम्यान अकोले तालुक्यातील करंडी (ब्राह्मणवाडा) गावचे सुपुत्र, शूरवीर जवान संदीप पांडुरंग गायकर यांनी देशासाठी प्राणार्पण केले . यावेळी अकोले तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने शहीद संदीपच्या बलिदानास सलाम करताना त्यांच्या कुटुंबासमवेत संघटनेच्या ४६:५पाठबळाचा पुनर्निर्धार व्यक्त केला व "शहीद संदीप यांना परत आणता येणार नाही... पण त्यांच्या कुटुंबामागे ठामपणे उभं राहणे आपले कर्तव्य आहे. सैनिकांच्या समर्पण व त्यागामुळेच देव देश आणि धर्माचे कार्य करता येत असते. त्यांच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने वीर जवान संदीप गायकर यांच्या पश्चात कुटुंबाला आधार म्हणून वारकरी संप्रदायाच्या वतीने ही मदत नाही तर देशभक्ता प्रती व्यक्त करण्यात आली.
यावेळी संगीत अलंकार इंद्रभान कोल्हाळ सर, संकेत महाराज आरोटे, नितीन महाराज देशमुख, संदीप महाराज थोरात, भीमराव महाराज हांडे यांनी संगीत प्रवचनातून देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून वीर जवान संदीप गायकर यांना श्रद्धांजली समर्पित केली.