shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नेवासात कामिका एकादशीला वैष्णवांचा महाकुंभ! लाखो भाविकांनी घेतलं ‘पैस खांब’ दर्शन, ज्ञानेश्वरीच्या पावन भूमीत भक्तिरसाचा उधाण…



अहिल्यानगर प्रतिनिधी :
महाराष्ट्राला ज्ञानेश्वरीसारखा दिव्य ग्रंथ देणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराजांची पावन कर्मभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेवासे तालुक्यातील तीर्थक्षेत्रात आज (दि. २१) कामिका एकादशीच्या शुभमुहूर्तावर वैष्णवांचा महासागरच उसळला. लाखो भाविकांनी पवित्र ‘पैस खांबा’चे दर्शन घेऊन अध्यात्मिक उन्नतीचा अनुभव घेतला.

ज्ञानेश्वर संस्थानचे अध्यक्ष महंत हभप देवीदास म्हस्के महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांसाठी दर्शन व महाप्रसादाची भव्य व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण परिसरात ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या जयघोषाने वातावरण भक्तिरसात रंगून गेलं होतं.

📿 पैस खांबाची अलौकिक महती…
ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या पवित्र खांबाला टेकून सच्चिदानंद महाराजांकडून ‘ज्ञानेश्वरी’ लिहून घेतली, त्या पैस खांबासाठी भव्य मंदिर उभारलं गेलं आहे. जगातला हा एकमेव असा प्रसंग आहे जिथे एका खांबासाठी भव्य मंदिर उभं आहे!

🌼 चमत्काराची कहाणी भाविकांना भारावून गेली…
कामिका एकादशीच्या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराजांचा अद्भुत चमत्कारही भाविकांनी स्मरण केला. अंत्ययात्रेत सती जाण्यासाठी निघालेल्या एका महिलेला ज्ञानेश्वर महाराजांनी “अखंड सौभाग्यवती भव” असा आशीर्वाद दिला आणि मृतदेहावर हात ठेवताच तो उठून बसल्याची अद्वितीय कथा भाविकांना ऐकवण्यात आली.

🍲 खिचडी महाप्रसाद व भक्तिमय वातावरण…
दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी संस्थानच्यावतीनं खिचडी महाप्रसाद वाटप करण्यात आलं. पंढरपूर, आळंदी, नाशिक, नगरसह महाराष्ट्रभरातून भाविकांनी नेवाशात हजेरी लावली. ढोल-ताशा, भजन, कीर्तन, वारकरी मंडळींच्या पालख्या यामुळे नेवाशात भक्तिरसाचा जल्लोष अनुभवायला मिळाला.

🙏 ज्ञानेश्वरीच्या पवित्र स्थळावर वैष्णव मेळ्याला भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती सोपान, मुक्ताबाई यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीला वेद-पुराणातही अलौकिक महत्त्व लाभलं आहे. त्यामुळे प्रत्येक एकादशीला इथं भक्तांचा ओघ वाढत असतो, पण आजच्या कामिका एकादशीला तर भाविकांची लाटच उसळली.


close