शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन )
शैक्षणिक बातमी
विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये दीप अमावस्या साजरी करण्यात आली.
प्राचार्य श्री सुहास विसाळ यांच्या प्रेरणेने कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री.विजय रसाळ होते. प्रसंगी मंचावर पर्यवेक्षक श्री.श्रीनिवास गजेंद्रगडकर, श्री.अनिल खामकर, पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती स्नेहलता कांबळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री.धनंजय काळे होते.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. संस्कृती विभाग प्रमुख श्री.धनंजय काळे यांनी दीपोत्सवानिमित्त स्वागत गीत म्हणून उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.
दीप अमावस्या साठी इयत्ता सातवी मधील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी आपल्या घरामध्ये असणारे पारंपारिक दिवे आणले. प्रशालेच्या प्रकाश हॉलमध्ये दिव्यांची सुंदर पद्धतीने सजावट करण्यात आली.
प्रशालेच्या पर्यवेक्षिका श्रीमती अक्षता पाध्ये यांनी दीप अमावस्या निमित्त विद्यार्थ्यांना छान मार्गदर्शन केले. दिव्याची माहिती आणि हिंदू संस्कृतीतील मराठी महिन्यांचे महत्त्व याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.विजय रसाळ यांनी आपल्या मनोगताद्वारे आपण साजरे करत असलेले सण समारंभ याचे उत्तम मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सोमनाथ ढुमणे, प्रास्ताविक श्रीमती सुनिता इथापे तर आभार श्रीमाती स्नेहलता कांबळे यांनी मानले.
दीपोत्सवानिमित्त नियामक मंडळ अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ.सतीश गवळी, सहकार्यवाह श्री.विजयजी भुरके नियामक मंडळ सदस्य तथा शाला समिती अध्यक्ष श्री.भगवानभाऊ आंबेकर यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमासाठी श्री.संकेत कवडे, श्री. श्रीकांत म्हसकर, श्री.वैभव सूर्यवंशी, श्रीमती वैशाली ढाकणे, श्रीमती सुनिता बनकर, श्रीमती शिवानी बागलाने, श्री.संजय पालवे तर सेवक श्री.गजानन कदम, श्री.मयूर पवार आणि श्री.सचिन गवळी यांनी मोलाचे सहकार्य केले.