shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्या वाटप.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना वह्या वाटप.

प्रतिनिधी
- एरंडोल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त एरंडोल शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष ईश्वर बि-हाडे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 10 मधील कागदीपुरा भागातील जि. प. उर्दू शाळा क्रं.2 येथे शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप कार्यक्रम संपन्न झाला.जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली जळगांव जिल्ह्याचे मा. पालकमंत्री मा.मंत्री डॉ.सतीश पाटील यांच्या शुभहस्ते शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या.

            सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (अप) गट जिल्हा कार्याध्यक्ष योगेश देसले, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभाक्षेत्र प्रमुख डॉ.शांताराम पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष भागवत पाटील,पारोळा कृ. उ.बाजार समिती संचालक सुनिल रामोशी,निंबा पाटील, माजीनगरसेवक शकुर मोमिन,युवक तालुकाध्यक्ष विजय पाटील,राष्ट्रवादी ओबीसी सेल तालुकाध्यक्ष डॉ.वाय. डी. पाटील,संदीप वाघ,महेंद्र पाटील,अनिल पाटील,सादिक कागदी, शरद भावसार, कल्पना बडगुजर, स्वप्निल पाटील,गनी टकारी, विजेंद्र मराठे, जिया कागदी,सचिन बोरसे,ललित सोनवणे,छोटु पाटील, स्वप्निल पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व फ्रंटलचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

close