शिर्डी एक्सप्रेस वृत्तसेवा अहिल्यानगर प्रतिनिधी, दिपक हरिश्चंद्रे.
सोमवार ता.२८/०७/२०२५
शनिशिंगणापूर देवस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी राहत्या घरी गळफास घेत आयुष्याचा केला शेवट....
अहिल्यानगर : शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त आणि विद्यमान उप कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी राहत्या घरी छताला गळफास घेऊन त्यांनी आयुष्याची अखेर केली. शेटेंच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. नितीन शेटे हे माजी आमदार शंकरराव गडाख यांचे जवळचे समर्थक म्हणून ओळखले जात होते. सोनई येथे शव विच्छेदन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून शनि शिंगणापूर देवस्थान विविध वादामुळे चर्चेत आहे. धर्मादाय आयुक्तांकडेही या प्रकरणी सुनावणीही सुरु आहे.
शनि शिंगणापूर मंदिर माजी विश्वस्त गळफास.....
काय आहे नेमकी आत्महत्या प्रकरण?...
शनिशिंगणापूर येथील शनी मंदिराचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. नितीन शेटे हे माजी राज्यमंत्री शंकरराव गडाख यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, शनी शिंगणापूर देवस्थानमधील सुरू असलेल्या भ्रष्टाचार चौकशीच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे.
पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून, प्राथमिक तपास सुरू आहे. शेटे यांच्या पार्थिवावर सोनई येथे शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळत आहे.
नितीन शेटे यांच्या आत्महत्येने शहरात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र शनी शिंगणापूर देवस्थान भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी सुरु असताना त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्यामुळे चर्चांना आले उधाण आलं आहे.
सार्वजनिक जीवनातील एक जबाबदार अधिकारी असलेल्या नितीन शेटे यांची अशा प्रकारे एक्झिट घेणं अनेक प्रश्न उभे करत आहे. देवस्थानमधील राजकीय हस्तक्षेप, आर्थिक घोटाळे आणि अंतर्गत कलह या सर्व गोष्टींचा तपास लावणं आता अत्यावश्यक बनलं आहे. ही केवळ आत्महत्या की दबावामुळे उचललेलं टोकाचं पाऊल? असा प्रश्न विचारला जात असून प्रशासनासह संपूर्ण राज्याचे लक्ष या प्रकरणाकडे लागलं आहे.
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (आहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600