चायनीज मांजा विक्रीवर कायदेशीर कारवाई करा.... बारामती शहर पोलीस स्टेशन येथे निवेदनाद्वारे योग्य कार्यवाहीची केली मागणी.
इंदापूर: बारामती शहरातील चायनीज मांजा विक्रेते यांच्यावर निर्बंध व कठोर कायदेशीर कारवाई करून भविष्यात होणाऱ्या गंभीर घटना टाळता येतील तसेच चायनीज मांजा विक्री करणाऱ्या वर पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अन्वये सदरील मांजा विक्रीस बंदी असून चायनीज मांजा विक्री वर कायदेशीर कारवाई करावी अशा संदर्भातचे निवेदन विधीतज्ञ हर्षद कोल्हे,श्रीधर ताटे, महेंद्र बगाडे, नुरी खान, कल्पना साळुंखे व रमेश गायकवाड यांनी सहीनिशी पोलीस निरीक्षक बारामती शहर पोलीस स्टेशन यांच्याकडे सादर केले आहे.
सदर निवेदनामध्ये म्हटले आहे की, 29 जुलै रोजी नागपंचमी असून सदरील काळात पतंग महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, सदरील काळात बारामती शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात पतंग व चायनीज मांजा विक्री होत असतो. यामध्ये बारामती शहरातील विविध दुकाने तसेच छोटे स्टॉल येथे सर्रास चायनीज मांजाची विक्री करतात व सदरील चायनीज मांजामुळे मागील वर्षी बरेच नागरिक गंभीर जखमी झालेले होते तसेच प्राणी, पक्षी हे सुद्धा गंभीर जखमी झालेले होते. तरी सदरील निवेदनाचा विचार करून या संदर्भात योग्य ती कार्यवाही करावी अशा संदर्भाचे निवेदन देण्यात आले आहे.
तसेच नागरिकांनी देखील नायलॉन मांजा खरेदी करू नये व आपले परिसरामध्ये नायलॉन मांजाची विक्री होत असेल तर पोलीसांना 112 क्रमांकावर कळविणेबाबत वकिलांमार्फत आवाहन करणेत आले आहे .