प्रकाश मुंडे/ बीड जिल्हा प्रतिनिधी:-
केज शहरातील अर्बन विज वितरण कंपनीने साठ टक्के विज बिल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केले असल्याची माहिती केज येथील उप कार्यकारी अभियंता एम.जी.सय्यद यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
महावितरणच्या विज वितरण कंपनीची एकुण थकबाकी 1 कोटी 28 लाख रुपये आहे.त्यापैकी 75 लाख रुपये वसूल करण्यात आले असून 341 लाख रुपये थकबाकी असल्याचे त्यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.केज शहरात विजबिल वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. विज वितरण कंपनीचे कर्मचारी प्रत्यक्ष ग्राहक यांच्या भेटी घेऊन विज बिल भरण्याचे आवाहन करत असुन थकबाकी दार ग्राहक विज बील भरण्यासाठी चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे विज बिल वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विज ग्राहक सहकार्य करताना दिसत आहेत.
विज बिलाची रक्कम रोख स्वरूपात स्विकारत आहेत त्यामुळे त्यामुळे ग्राहकांना विना अडथळा बिल भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.या बद्दल ग्राहक समाधान व्यक्त करताना दिसत आहेत.यावेळी विज वितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता एम.जी.सय्यद,विज वितरण सहाय्यक विष्णु तेलंग , लाईनमन शिवाजी घुले यांच्या सह विज वितरण कंपनीचे कर्मचारी विज बिल वसुलीचे काम करत आहेत.