shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वॉरंट बजावणी मोहीमत सोनई पोलिसांनी केली सात जणांना अटक

प्रतिनिधी मोहन शेगर सोनई 
सोनई (वा.) न्यायालयीन प्रकरणांमध्ये प्रलंबित असलेल्या वॉरंट व समन्सची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सोनई पोलीस ठाण्याच्या वतीने दि. १२ मे रोजी पहाटे ५.३० ते सकाळी ९ या वेळेत विशेष वॉरंट बजावणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण २८ न्यायालयीन आदेशांची यशस्वी पूर्तता करण्यात आली. या कारवाईदरम्यान ९ अजामीनपात्र वॉरंट, १० जामीनपात्र वॉरंट तसेच ९ समन्स बजावण्यात आले. अजामीनपात्र वॉरंटांपैकी ७आरोपींना अटक करण्यात आली, तर २ आरोपींना पावतीवर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. या मोहिमेमुळे न्यायालयीन आदेशांची प्रभावी अंमलबजावणी झाली असून,


अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे

अजीज हुसेन शेख (रा. चांदा), रवींद्र प्रकाश शेटे (रा. हनुमानवाडी, सोनई), साईनाथ मच्छिंद्र पवार (रा. शिंगवे तुकाई), बाळासाहेब सोनाजी गायकवाड (रा. शिंगवे तुकाई), सुमित म्हसू कुसळकर (रा. सोनई), नानासाहेब काशिनाथ ढवळे (रा. चांदा), सतीश सूर्यभान पुंड या आरोरींचा समावेश आहे. तर अशोक उत्तम फुलमाळी (रा. चांदा), आदिनाथ यल्लापा फुलमाळी (रा. सोनई) यांना पावतीवर न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

फरार व अनुपस्थित आरोपींविरुद्ध पोलिसांचा कारवाईचा धडाका कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोनई पोलीस ठाण्याच्या या कार्यवाहीचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
close