डॉ. धनंजय मंडलिक यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या अधिष्ठाता (डिन) पदी निवड झाल्याबद्दल शैक्षणिक, सामाजिक व व्यापारी क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शैक्षणिक क्षेत्रातील दीर्घ अनुभव, अभ्यासू वृत्ती आणि विद्यार्थीकेंद्री दृष्टीकोन यामुळे डॉ. मंडलिक यांनी शिक्षण क्षेत्रात विशेष ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या निवडीमुळे विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन शाखेला नवी दिशा आणि बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
डॉ. मंडलिक यांनी यापूर्वी विविध शैक्षणिक व प्रशासकीय जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या असून संशोधन, गुणवत्ता वृद्धी आणि आधुनिक शिक्षणपद्धती यावर त्यांनी सातत्याने भर दिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल नवसह्याद्री शैक्षणिक संकुलाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री. पोपटराव सुके साहेब, उपाध्यक्षा सौ.सायली सागर सुके मॅडम, ग्रुप डायरेक्टर सागर जी सुके सर, मॅनेजमेंट विभागाचे संचालक डॉ. तानाजी दबडे, मॅनेजमेंट विभागातील डॉ.सुहास पाखरे ,डॉ. बाळासाहेब भमनगोळ,डॉ. सुनील खिलारी, डॉ. निलेश लिंबोरे , डॉ. सिद्धार्थ सोरटे, प्रा.रमेश काकडे, प्रा. निरज सापे ,प्रा. प्रतीक मंडलिक, राजेंद्रजी संकपाळ तसेच नवसह्याद्री शैक्षणिक संकुलातील विविध शाखेचे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर वृंद आदी मान्यवरांनी शुभेच्छा देत स्वागत केले आहे.

