*व्याहाळी ग्रामस्थांचा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न.* *
*“व्याहाळी भूषण” पुरस्काराने गुरु-शिष्यांचा गौरव.*
इंदापूर: व्याहाळी (ता. 9 ) येथील ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भैरवनाथ मंदिर व्याहाळी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे भव्य आयोजन करण्यात आले. सात दिवस चाललेल्या या सोहळ्यात नामांकित कीर्तनकारांच्या कीर्तनांनी, भजन-प्रवचनांनी आणि भक्तीमय कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर आध्यात्मिक वातावरणाने भारावून गेला.
सप्ताहादरम्यान दररोज ज्ञानेश्वरी पारायण, काकडा, भजन, प्रवचन यांसह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. पालखी सोहळा आणि अन्नदान कार्यक्रमालाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सप्ताहाचा समारोप काल्याच्या कीर्तनाने आणि महाप्रसादाने अत्यंत भक्तीभावाने झाला.
या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे शेवटच्या दिवशी आयोजित करण्यात आलेला *“व्याहाळी भूषण”* पुरस्कार सोहळा. गावातील यशस्वी विद्यार्थ्यांचा तसेच त्यांना घडविणाऱ्या शिक्षकांचा विशेष सन्मान करण्यात आला. गुरु-शिष्य परंपरेचा गौरव करत या पुरस्काराने त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. वैष्णवी मोरे सहाय्यक कर निरीक्षक , तुषार ठेबे आर एफ ओ , वर्षाराणी उत्तेकर आदर्श शिक्षिका , संतोष हेगडे आदर्श शिक्षक , विठ्ठल पवार आदर्श महसूल अधिकारी , मयूर शिंदे कृषी अधिकारी , स्वरूप बरीदे सहाय्यक सहकार अधिकारी , सुजित मोरे मुंबई पोलीस , सुजित विजय मोरे पिंपरी चिंचवड पोलीस यांना व्याहाळी भूषण पुरस्कार देण्यात आला.
सन्मानित व्यक्तींना विठ्ठल-रुक्मिणीची सुंदर मूर्ती, शाल, पुष्पहार आणि मानपत्र देऊन गौरविण्यात आले. हा सन्मान काल्याचे कीर्तनकार गणेशानंद महाराज धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी इयत्ता दहावीत यशस्वी झालेल्या प्रेरणा सुभाष पवार (प्रथम) पूर्व उमेश बरीदे (द्वितीय) कार्तिकी शामराव पवार (तृतीय) प्रज्वल गौतम चितारे (चतुर्थ) यांचाही सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी विठ्ठल पवार, नामदेव शिरसाट , सुयोग दिवसे, माणिक बरळ , दामोदर पवार, सागर पवार, दत्तात्रय मोरे , आबा पवार , सुभाष पवार , नानासाहेब पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण सप्ताह सोहळा भक्ती, संस्कार आणि सामाजिक एकोप्याचे सुंदर उदाहरण ठरला.

