shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पत्रकार संजय महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार; सामाजिक कार्य, पत्रकारिता आणि साईसेवेतील योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरव



सामाजिक कार्य, पत्रकारिता आणि साईसेवेतील योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरव

शिर्डी प्रतिनिधी :
शिर्डी येथील साई श्रद्धा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा पत्रकार संजय महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि साईसेवेच्या माध्यमातून समाजहितासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या संजय महाजन यांना वाढदिवसानिमित्त मान्यवरांनी शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
याप्रसंगी गोरख सोनवणे, नरेंद्र निकम, मच्छिंद्र खैरनार यांसह आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते संजय महाजन यांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

संजय महाजन हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्न मांडण्याचे कार्य करत आहेत. तसेच साई श्रद्धा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक, धार्मिक आणि सेवाभावी उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. समाजातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात.

वाढदिवसानिमित्त झालेल्या या सत्कारप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी संजय महाजन यांच्या मनमिळावू स्वभावाचे, समाजाभिमुख कार्याचे आणि पत्रकारितेतील योगदानाचे कौतुक केले. समाजासाठी निस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या अशा व्यक्तिमत्त्वाला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि यश लाभो, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

कार्यक्रमात उपस्थितांनी संजय महाजन यांना साईबाबांचा फोटो देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. साईबाबांच्या कृपेने त्यांचा सेवामय प्रवास असाच अखंड सुरू राहो, अशी प्रार्थना मान्यवरांनी व्यक्त केली.
close