shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

न्याहळोद केंद्रात नूतन विद्यालयाची उज्ज्वल परंपरा कायमसलग आठव्या वर्षी केंद्रात प्रथम येण्याचा मान; शाळेचा निकाल ९४.११ टक्के



 शिर्डी प्रतिनिधी:
धुळे तालुक्याती न्याहळोद येथील महात्मा ज्योतिबा फुले संचलित नूतन विद्यालयाने यंदाच्या दहावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत न्याहळोद केंद्रात पुन्हा एकदा आपला दबदबा कायम ठेवला आहे. शाळेचा एकूण निकाल ९४.११ टक्के लागला असून केंद्रातील प्रथम तीन क्रमांक नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनीच पटकावले आहेत. विशेष म्हणजे सलग नवव्या वर्षी केंद्रात प्रथम येण्याचा मान नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मिळविला आहे.
यामध्ये कु. पूनम संदीप महाजन हिने ८९ टक्के गुण मिळवून केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला. कु. प्रतिक्षा सुरेश झाल्टे हिने ८८.४० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर कु. वैभवी राकेश जिरे हिने ८८ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक संपादन केला.
विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून यशस्वी विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. संस्थेचे अध्यक्ष दिलीप भाऊ उपाध्ये, माजी उपसरपंच देविदास जिरे, उपाध्यक्ष भास्कर माळी, विजू आप्पा पवार, रमेश जैन, राजाराम सैंदाणे, कैलास पाटील, चांदखा पठाण, अमृत पवार तसेच मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
close