*स्वच्छ सर्वेक्षण 2024 स्पर्धे मध्ये इंदापूर नगर परिषदेची देशपातळीवर उत्तुंग भरारी...*
देशात पाचवा व राज्यात प्रथम क्रमांकावर झेप.
इंदापूर : इंदापूर शहराची छोट्या शहरांत (20 ते 50 हजार लोकसंख्येच्या गटात) तसेच 1581 शहरामध्ये आज अखेरची उच्चतम कामगिरी करून *देशात पाचवा व राज्यात प्रथम क्रमांकावर झेप घेतली*
*कचरा मुक्त शहर मानांकनामधील थ्री स्टार मानांकन, तसेच ओ डी एफ + + मनांकन प्राप्त झाले.* स्वच्छ सर्वेक्षणामध्ये घरोघरी कचरा संकलन, कचरा विलगीकरण, कचरा प्रक्रिया कचरा तक्रारींचे निवारण सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता व्यावसायिक रहिवासी व मार्केट क्षेत्र स्वच्छता, जल स्तोत्र व सार्वजनिक शौचालय स्वच्छता तसेच स्वच्छता ही सेवा कोंढाळमुक्त रस्ते व ब्लॅक स्पॉट सुशोभीकरण आदींचा समावेश झाला आहे. इंदापूर शहराची स्वच्छ
सर्वेक्षण स्पर्धेमध्ये मध्ये आज अखेरची सर्वोत्तम कामगिरी आहे. याप्रसंगी कर्मचाऱ्यांनी फटाके वाजून एकमेकांना पेढे वाटून जल्लोष साजरा केला. यावेळी मार्गदर्शन करताना इंदापूर नगर परिषदेचे सन्माननीय मुख्याधिकारी श्री रमेश ढगे यांनी कर्मचाऱ्यांचे गुणगौरव करून असे सांगितले की हा सन्मान फक्त इंदापूर नगर परिषदेचा नव्हे तर संपूर्ण इंदापूर शहराच्या नागरिकांचा विशेष सन्मान आहे.आपल्या शहराने दाखवलेली जागरूकता नागरिकांचा स्वच्छतेसाठी सहभाग आणि कर्मचाऱ्यांनी केलेले प्रामाणिक श्रम यामुळे हे शक्य झाले आहे.आपण पुढेही स्वच्छता हीच सेवा मानून शाश्वत शहरांकडे वाटचाल करीत इंदापूर शहराची प्रगती करू अशी प्रतिक्रिया इंदापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी व्यक्त केली.