क्रीडा विभागाकडून राज्यात दीड लाख गोविंदांना शासकीय विमा कंपनी मार्फत विमा संरक्षण - क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे.
इंदापूर : मानवी मनोरे रचण्याच्या प्रकारास सहासी खेळाच्या दर्जा शासनाने दिला आहे. गोविंदाचा वाढता प्रतिसाद विचारात घेऊन 2025 मधील दहीहंडी उत्सवाच्या अनुषंगाने क्रीडा विभागाकडून राज्यात दीड लाख गोविंदांना शासकीय विमा कंपनी मार्फत विमा संरक्षण देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.राज्य शासनाच्या या निर्णयामुळे गोविंदा मध्ये उत्साहाचे वातावरण आहे अशी माहिती क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, राज्य शासनाच्या या निर्णयामुळे गोविंदा मध्ये उत्साहाचे वातावरण आहे. याकरिता अंदाजे एक कोटी 25 लाख एवढा निधी राज्य क्रीडा विकास निधीतून उपलब्ध करून देण्यात येईल. 2023 व 2024 मध्ये प्रत्येकी 75000 गोविंदांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी मार्फत विमा संरक्षण देण्यात आले होते. यावर्षी गोविंदांच्या संख्येत दुपटीने वाढ करण्यात आले आहे.
दहीहंडीमध्ये मनोरे रचताना तरुणांनी आपली काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दरम्यान दीड लाख गोविंदांना शासकीय विमा कंपनी मार्फत विमा संरक्षण देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याने गोविंदा मध्ये उत्साहाचे वातावरण आहे.