कौठळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनुभवले जलसाठ्यांचे प्रत्यक्ष स्वरूप.
इंदापूर : जिल्हा परिषदेच्या कौठळी शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी परिसरातील विविध जलसाठ्यांना भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. परिसर अभ्यास विषयातील ‘जलसाठे’ या पाठाचा अनुभवातून अभ्यास करण्यासाठी मार्गदर्शक शिक्षक भारत ननवरे सर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.
विद्यार्थ्यांनी विहीर, बंधारा, आड, विंधन विहीर (बोअरवेल), शेततळे, कॅनॉल, रांजण आणि पाणपोई यांची माहिती प्रत्यक्ष पाहून समजून घेतली.
विशेषतः बंधाऱ्याचे बांधकाम, त्यामध्ये साठवलेले पाणी, आणि त्याचा शेतीसाठी होणारा उपयोग याचा विद्यार्थ्यांनी जवळून अभ्यास केला. हिरवाईने नटलेला परिसर आणि वाहते पाणी पाहताना त्यांना पाण्याच्या संवर्धनाचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजले.
शेततळे, कॅनॉल, रांजण, विहीर यांच्यातील फरक काय, त्यांचा उपयोग कसा होतो, हे सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या नोंदीत उतरवले.
हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये केवळ ज्ञान वाढवणारा नाही, तर पाण्याविषयीची संवेदनशीलता आणि जबाबदारी निर्माण करणारा ठरला.
---
"पुस्तकातले धडे डोळ्यांनी पाहिले,
प्रश्न नव्हतेच, कारण उत्तर समोर उभं होतं."