shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आधार आदिवासी सेवाश्रमात शालेय साहित्य व खाऊ वाटप.

आधार आदिवासी सेवाश्रमात  सालेय साहित्य व खाऊ वाटप.  आपला

आपला वाढदिवस आपण दरवर्षी आपल्या आप्तेष्टांना सोबत घेऊन साजरा करतो पण ज्या कोवळ्या मुलांचं या जगात कुणी नाही अशांना आपलंसं करून सोबत घेऊन आनंद साजरा करण्यात खरोखर मनापासुन आनंद व समाधान मिळते असे उद्गगार आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी व्यक्त केले.

त्यांनी आपला वाढदिवस आधार आदिवासी सेवा आश्रमाच्या मुलांसोबत साजरा करून समाजापुढे एक उत्तम उदाहरण ठेवले आहे असे मान्यवरांकडून त्यांच्या मनोगतात सांगितले गेले.

विशेष सहकार्य : शिवतेज माहिती अधिकार व पत्रकार संघटना आणि आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन सर्व पदाधिकारी सर्व उपस्थित होते. .

जितेंद्र पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून रुग्णसेवा करत असुन संपूर्ण महाराष्ट्रभर आरोग्य तपासणी उपचार व शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करून रुग्णांना दिलासा देण्यासाठी प्रयत्नरत आहेत.

त्यांच्या या कार्याचे अनेक मान्यवरांकडून कौतुक केले जाऊन अनेक नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्याचे संस्थेचे सहसचिव संदिप ब्रम्हे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

यात धुळे जिल्हा पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार श्रीकांत शिंदे, तृप्ती देसाई, नविनसेठ गवळी( नगरसेवक ),उमेशदादा गुंजाळ ( नगरसेवक ) रवींद्रदादा पाटील ( नगरसेवक )आदी मान्यवरांची शुभेच्छापत्रे मिळाल्याचे समजते.

close