एरंडोल, प्रतिनिधी –
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या आदेशानुसार व जळगाव (पश्चिम) जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्यामजी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडोल येथे भारतीय जनता पक्षाच्यावतीने गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शहरातील विविध मान्यवर गुरूंचा सत्कार करून त्यांचे कार्य गौरविण्यात आले.
🪔 ओम शांती सेंटर येथे ब्रह्मकुमारी पुष्पा दीदी यांचा सत्कार करण्यात आला.
🪔 आदर्श शिक्षक म्हणून ओळख असलेले पी.ओ. बडगुजर सर यांचाही गौरव करण्यात आला.
🪔 तसेच मरी माता मंदिराचे अध्यात्मिक पुजारी यशवंत ज्ञानेश्वर बुंदेले महाराज यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
या सर्व सत्कार समारंभ प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे एरंडोल-विखरण-रिंगणगाव मंडळ अध्यक्ष श्री. योगेश युवराज महाजन, जिल्हा चिटणीस श्री. निलेश परदेशी, श्री. अमरजितसिंग पाटील, एडवोकेट श्री. दिलीप पांडे, श्री. मयूर ठाकूर, श्री. आनंद सूर्यवंशी, श्री. भूषण बडगुजर, श्री. मोहित आंधळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या उपक्रमातून गुरूंच्या महत्त्वावर प्रकाश टाकण्यात आला असून, भारतीय संस्कृतीतील गुरू-शिष्य परंपरेचे जतन आणि सन्मान करण्याचा उद्देश स्पष्ट दिसून आला.
🌸 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुदेवो महेश्वरः। गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥ 🌸