जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
अंधेरी - पश्चिम, मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभाग अध्यक्ष विशाल हरयान यांच्या वतीने/देखरेखीखाली वर्सोवा विधानसभा अंतर्गत - काजूपाडा, मुन्शी कंपाउंड, शुक्ला कंपाउंड, उजाला नगर, सरोटा पाडा, साई पवन सोसायटी, रामकरण चाळ विभागातील नागरिकांसाठी मोफत छत्री वाटप कार्यक्रम यशस्वीपणे दिनांक 11/07/2025 रोजी पार पडला!..
प्रत्येक जेष्ठ नागरिकास उत्स्फूर्तपणे सेवा पुरवण्यात आली.
प्रभाग 62/63 मधील सदर कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मनापासून कौतुक व धन्यवाद विशाल हरयान यांनी याबद्दल व्यकत केले.