प्रकाश मुंडे बीड/ जिल्हा प्रतिनिधी*:- मौजे तांबवा येथील शेतकरी महेश मोहनराव सत्वधर राहणार समर्थ नगर केज ,तालुका केज , जिल्हा बीड येथील रहिवासी असून त्यांचे शेत तांबवा शिवारामध्ये सर्वे नंबर 190/2 मध्ये आहे.
त्यांच्या शेतामध्ये दिनांक 03/07/2025 रोजी महाराष्ट्र शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी अनुदानित 3 hp सोलार पंप बसवण्यात आला होता. दररोज प्रमाणे शेतकरी शेतामध्ये जात असतो महेश सत्वधर हे नित्य नियमाने शेतामध्ये फेरफटका मारायला गेले असते त्यांना असे लक्षात आले की इन्स्टॉल केलेले तीन एचपी सोलर मोटरचे सहापैकी तीन सोलर पॅनल जागेवरती नाहीयेत, त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता असे लक्षात आले की शेतामधील आणखीन पेरणी यंत्र म्हणजे टोकन मशीन हे देखील गायब होती त्याची पण चोरी झाली होती .
आपल्या शेतात चोरी झाल्याचे दिसून येताच महेश सत्वधर या शेतकऱ्यांने केज पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून पुढील कारवाई सुरू आहे. एका गरीब कुटुंबांतील शेतकऱ्यावर हे संकट ओढावले आहे तरी पोलिस प्रशासनाने या घटनेच्या त्वरित तपास करुन सदरील घटनेतील आरोपींना अटक करुन शेतकरी महेश सत्वधर यांना झालेली नुकसान भरपाई आरोपी कडून वसूल करुन न्याय देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.