-------🌹🌹🌹---------
संजय माकणे (प्रतनिधी)
स्वंय प्रकाश सेवाभावी संस्था झरी बु च्या वतीने आज दि.१२/८/२०२५ रोजी सिद्धेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता १० वी १२ वीच्या सर्वच विद्यार्थ्यांना प्रत्येकी अर्धा डझन वह्यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य निळकंठ सकनुरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुर्के,सचिव अॅड. ज्ञानोबा पवार, सदस्य नवनाथ सुरवसे, गोविंद खंदारे,अंगद नवगरे, सत्यवान डोंगरे, विनोद सुगावकर, हे होते .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.दयानंद झांबरे यांनी तर प्रस्ताविक साहित्यिक प्रा.वैजनाथ सुरनर यांनी केले . यावेळी व्यंकट शिंदगे, बालाजी सोमवंशी,शेख जावेद,विनय नकाते,सुरज पाटील,जोतिराम तावरे,शेख मुराद इ सर्व कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आभार पत्रकार प्रा. मारोती बुद्रुक पाटील यांनी मानले.