३ गट, ६ गण – इच्छुक उमेदवार सज्ज; आरक्षण ठरवणं बाकी, हरकतीसाठी २१ जुलैपर्यंत मुदत.
एरंडोल प्रतिनिधी –
जळगाव जिल्हा परिषद व एरंडोल पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शासनाने गट व गणांची रचना जाहीर केली असून, एरंडोल तालुक्यातील गट व गणांची संख्या आणि रचना मागीलप्रमाणेच म्हणजेच ‘जैसे थे’ राहणार आहे. या निर्णयामुळे इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांनी तयारीला सुरूवात केली आहे.
तालुक्यात एकूण ३ जिल्हा परिषद गट –
1. विखरण – रिंगणगांव
2. तळई – उत्राण
3. कासोदा – आडगाव
तर, पंचायत समितीचे एकूण ६ गण जाहीर करण्यात आले आहेत.
प्रत्येक गणातील गावांची यादी पुढीलप्रमाणे –
🔹 १) विखरण गण – विखरण, वरखेडी, उमरदे, पातरखेडे, भालगांव बु., टोळी खु., जवखेडे खु./बु., पिंप्री प्र.चां./बु., पिपळकोठे खु./बु.
🔹 २) रिंगणगांव गण – रवंजे खु./बु., खर्ची खु./बु., रिंगणगांव, पिंपळकोठे प्र.चां., सावदे प्र.चां., टाकरखेडे, कढोली, वैजनाथ, खेडी खु., दापोरी
🔹 ३) तळई गण – तळई, अंतुर्ली, जवखेडे सिम, गालापूर, खडके बु./खु./सिम, वनकोठे, खेडगांव
🔹 ४) उत्राण गण – उत्राण अ.ह./गु.ह., नागदुली, भातखेडे, ताडे, हणमंतखेडे सिम, बाम्हणे, निपाणे, आनंदनगर
🔹 ५) कासोदा गण – कासोदा
🔹 ६) आडगाव गण – आडगाव, मालखेडे, फरकांडे, नानखुर्द बु./खु., हणमंतखेडे बु., धारागीर, जळू, सोनबर्डी
आरक्षण निश्चिती प्रक्रियेची प्रतिक्षा
सद्यःस्थितीत गट व गणांची रचना निश्चित करण्यात आली असली तरी आरक्षणाचे अंतिम निर्धारण अद्याप बाकी असून २१ जुलै २०२५ पर्यंत हरकती व सूचना जिल्हा प्रशासनाकडून मागविण्यात आल्या आहेत.
गेल्या निवडणुकीत ३ जि.प.गटांपैकी २ जागा महिला राखीव होत्या.
विखरण – रिंगणगांव गट: सर्वसाधारण राखीव
तळई – उत्राण गट: अनुसूचित जाती महिला
कासोदा – आडगाव गट: सर्वसाधारण महिला
नवीन आरक्षणानंतर राजकीय हालचालींना वेग येणार हे निश्चित!