shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मंथन सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये एल.जी. बनसुडे विद्यालयातील विद्यार्थ्यांचे नेत्र दीपक राज्यस्तरीय घवघवीत* यश.

*मंथन सामान्य ज्ञान परीक्षेमध्ये एल.जी. बनसुडे विद्यालयातील विद्यार्थ्यांचे नेत्र दीपक राज्यस्तरीय घवघवीत* यश.
इंदापूर : पळसदेव(ता-इंदापूर) येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल.जी. बनसुडे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मंथन स्पर्धा परीक्षेत  राज्यस्तरीय नेत्र दीपक  घवघवीत यश संपादन केले.मंथन परीक्षेमधून मुलांची भविष्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी व्हावी व त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत व्हावा म्हणून विद्यालयामध्ये इयत्ता 1 ली पासूनच मंथन परीक्षेचे मार्गदर्शन केले जाते व मुलांना भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयार केले जाते. शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये विद्यालयातील एकूण 90 ते 100 विध्यार्थ्यांनी या परीक्षेमध्ये सहभाग दर्शवला होता.त्यापैकी 5 विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय मजल मारली आहे. यामध्ये कु .भैरवी चैताली प्रितम लावंड (इयत्ता -1इंग्लिश )राज्यस्तरीय तृतीय, कु.श्रेयश माधुरी दिनेश गायकवाड (इयत्ता -2इंग्लिश )राज्यस्तरीय पाचवा, कु. पूर्वा माया सदानंद भुसे (इयत्ता -2इंग्लिश )राज्यस्तरीय सातवा, कु. अलिना अफ्रोज फिरोज सय्यद( इयत्ता -2इंग्लिश )राज्यस्तरीय आठवा,कु. वेदांत निलम रमेश लावंड.(इयत्ता -2इंग्लिश )राज्यस्तरीय आठवा या सर्व विद्यार्थ्यांचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण समारंभ  शिक्रापूर, पुणे येथे मा.श्री.  राजेश क्षीरसागर साहेब -अध्यक्ष महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,विभागीय मंडळ कोल्हापूर यांच्या  हस्ते  पारितोषिक देऊन पार पडला.  व मार्गदर्शक शिक्षिका  सौ. चैताली प्रितम लावंड, सौ. तनुजा अनिल फुगे यांच्या अथक परिश्रमातून हे यश संपादन झाले आहे.संस्थेचे अध्यक्ष हनुमंत बनसुडे, कार्याध्यक्षा नंदाताई बनसुडे, उपाध्यक्ष शितल शहा, सचिव नितीन बनसुडे,प्रिन्सिपल वंदना बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे, उपमुख्याध्यापक सुवर्णा वाघमोडे, विभाग प्रमुख प्रवीण मदने, तेजस्विनी तनपुरे, ज्योती मारकड, सीमा बाराते व  पालकवर्ग यांनी तसेच सर्व शिक्षक वृंद व पालकांनी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचा गुणगौरव व कौतुक करून अभिनंदन केले.
close