shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संत तुकाराम महाराज परतीचा पालखी सोहळ्यास गोखळी गोफणेवस्ती येथे समस्त गोफणे परिवारातर्फे महाप्रसाद.

संत तुकाराम महाराज परतीचा पालखी सोहळ्यास 
गोखळी गोफणेवस्ती येथे समस्त गोफणे परिवारातर्फे 
महाप्रसाद.
इंदापूर : आज रविवार दि. 13जुलै  रोजी जगद्गुरु संत तुकाराम महाराज परतीचा पालखी सोहळा दरवर्षी सालाबाद प्रमाणे वडापुरी येथील मुक्काम अटकून विठ्ठलवाडी, इंदापूर, गोखळी, तरंगवाडी, झगडेवाडी निमगाव केतकी मार्गे पुढे मार्गस्थ होत असतो. आज सकाळी न्यारीचा विसावा व गोखळी गोफणेवस्ती येथे महाप्रसाद समस्त गोफणे  परिवारातर्फे असतो.
 परंतु मागील वर्षी काही लोकांच्या म्हणण्यानुसार पालखी वडापुरी येथून रामकुंड मार्गे पुढे मार्गस्थ होणार होते. मागील वर्षीच पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी विरोध दर्शवून पालखी सालाबाद प्रमाणे जात असणाऱ्या मार्गाने जावे असे पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ व ग्रामस्थ ग्रामपंचायत या सर्वांचे ठराव व पाच हजार लोकांच्या सह्याचे निवेदन पालखी प्रमुखांना सहा महिन्यापूर्वी देण्यात आले होते.
 या सर्व निवेदनाची दखल घेऊन संस्था प्रमुखांनी गोखळी, इंदापूर, तरंगवाडी, विठ्ठलवाडी,  झगडेवाडी. येथील ग्रामस्थांना आश्वासन दिले होते की पालखी दरवर्षी सलाबादप्रमाणे असणाऱ्या मार्गाने जाणार. त्याप्रमाणे ठरलेल्या वेळापत्रकानुसार जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा परतीचा पालखी सोहळा दिलेल्या शब्दाप्रमाणे व परंपरेप्रमाणे आला व सर्व वारकरी मंडळींचे जेवणाची सोय गोखळी येथील समस्त गोफणे परिवाराने केली होती. ती अनेक पिढ्यान पिढ्या चालत आलेली आहे. याचे भाग्य गोफणे परिवाराला लाभते म्हणून समस्त परिवाराने जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रमुख मोरे महाराज व त्यांच्या संपूर्ण टीमचे गोफणे परिवार तसेच पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांच्या वतीने मानाचे श्रीफळ शाल व हार देऊन सन्मान करण्यात आला व पालखी सोहळा पुढे मार्गस्थ झाला.
यावेळी इंदापूर येथील कुशाल  कोकाटे महाराज, गुजर सर,बाळू मकर,सुरेश वाघमोडे,हरी पोळ,तोलाराम गोफणे, तात्याबा गोफणे सर, ज्ञानदेव गोफणे,अनिल चितळकर, गेनदेव तरंगे,पोपट शिंदे,श्रावण चोरमले, नवनाथ गोफणे महाराज,राजेंद्र गोफणे,नितीन गोफणे सर्व गोखळी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ होते.
 सालाबादप्रमाणे अन्नदान करण्याचे परम भाग्य लाभावे हीच जगद्गुरु संत तुकाराम महाराज चरणी प्रार्थना गोफणे परिवार यांच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती नितीन गोफणे यांनी दिली.
close