काटी ग्रामपंचायतीच्या वतीने मोफत कचराकुंडी वाटप.
इंदापूर : काटी गावचे नूतन सरपंच प्रा.विपुल बबन वाघमोडे यांच्या संकल्पनेतून स्वच्छ काटी सुंदर काटी या उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायत काटी तर्फे 15 व्या वित्त आयोगातून गावातील शेकडो कुटुंबांना ओला कचरा व सुका कचरा साठविण्यासाठी प्रत्येकी 2 मोफत कचराकुंडीचे वाटप करण्यात आले. या योजनेच्या माध्यमातून गाव स्वच्छ ठेवण्याचा ध्यास घेतला असून याचाच एक भाग म्हणून मागच्या महिन्यापासून गाव स्वच्छ ठेवण्यासाठी गावात सर्व रस्ते,मंदिरे,स्मशानभूमी ई. ठिकाणी स्वछता केली गेली. या पुढील काळात असेच समाजपयोगी उपक्रम राबविण्याचा ध्यास सरपंच विपुल वाघमोडे यांनी घेतला असून सर्व नागरिकांनी समाजसेवेसाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे
सदर कार्यक्रमासाठी काटी ग्रामपंचायतचे उपसरपंच श्रीमती सुवर्णा बनसोडे,मा.सरपंच नंदकुमार सोलणकर, सदस्य अतुल वाघमोडे, मा.उपसरपंच सचिन माने, मा.उपसरपंच सौ.उमा यादव,सदस श्री.सुनील लवटे ग्रामसेवक संतोष मोहिते तसेच गावाचे ग्रामस्थ उपस्थित होते.अशी माहिती विपुल वाघमोडे यांनी दिली.