अमरावती प्रतिनिधी :
माजी नगरसेवक व बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष अजयभाऊ गोंडाणे यांनी गेली दोन दशके समाजसेवेच्या माध्यमातून आपला ठसा उमटवला आहे. आंदोलनात्मक पद्धतीने पीडित, शोषित आणि वंचित घटकांसाठी लढा देत त्यांनी न्याय मिळवून देण्यासाठी अनेक वेळा रस्त्यावर उतरून संघर्ष केला. गरीबांच्या सुखदुःखात सहभागी होऊन, त्यांच्या हक्कांसाठी आवाज बुलंद करत त्यांनी खऱ्या अर्थाने लोकनायकाची भूमिका निभावली आहे.
जनतेच्या अडचणी आपल्या स्वतःच्या अडचणी समजून सोडवणारे, स्वार्थाला दुय्यम मानून समाजहिताला प्राधान्य देणारे असे थोडेच नेते असतात. अजयभाऊंचे कार्य अलौकिक, अभिमानास्पद आणि प्रेरणादायी आहे. त्यांच्या या लोकहितैषी कार्यामुळे आज अमरावतीतील जनमानस त्यांच्याकडे भावी आमदार म्हणून पाहत आहे.
समाजातील वंचितांना खरे न्याय देण्याची क्षमता आणि त्यांची ठाम भूमिका यामुळे त्यांनी लोकांच्या मनात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामाजिक बांधिलकीची जपवणूक करत गरजूंपर्यंत पोहोचणारे, आश्वासन न देता प्रत्यक्ष मदतीचा हात देणारे अजयभाऊ गोंडाणे हे आज अमरावतीच्या राजकारणातील आशेचा किरण ठरत आहेत.
अशा लोकहिताच्या कार्यामुळे त्यांची कीर्ती सर्वत्र अधोरेखित होत असून, जनतेतून एकच आवाज उमटतोय –
“अमरावतीला हवा आहे अजयभाऊंसारखा आमदार!”
लोकहितासाठी कार्यरत, जनतेचा खरा सोबती – अजयभाऊ गोंडाणे.